Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एकी केल्यानंतर आता महायुतीमध्ये सुद्धा निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता जागावाटप कळीचा मुद्दा असणार आहे. दरम्यान, एकत्र लढण्यावर दोन्ही आघाड्यांमध्ये एकमत झालं असलं तरी अजूनही जागा वाटपावरून सुंदोपसुंदी सुरुच आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपामध्ये 33- 3315 समीकरण ठरल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादीला केवळ 15 जागांवर बोळवण होत असल्याने अधिकच्या जागांची मागणी केल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे युती झाली असली, तरी जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.  

Continues below advertisement

तिन्ही पक्षांच्या उप समित्यांची आज बैठक

उमेदवार निश्चितीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या उप समित्यांची बैठक आज होणार आहे. काल झालेल्या बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे आमदार महाडिक, जयंत पाटील यांच्या बैठकीत महायुतीमध्ये करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. तिन्ही पक्षांकडून आता सक्षम उमेदवार निवडण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपकडून आमदार महाडिक, प्रा. जयंत पाटील प्रमुख पदाधिकारी उपसमितीमध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष आदिल फरास, महेश सावंत संदीप कवाळे यांचा उप समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही उप समित्यांची बैठक आज होत असून कोणत्या प्रभागात उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे याबाबतची चाचणी केली जाणार आहे. 

शिवसेना शिंदे गटाच्या आज मुलाखती 

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायच्या उद्देशातून शिवसेना शिंदे गटाकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला आहे. आज (20 डिसेंबर) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आतापर्यंत 196 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. या सर्वांच्या मुलाखती आज संपर्क कार्यालयामध्ये होणार आहेत.

Continues below advertisement

मविआ सुद्धा निवडून येणाराच उमेदवार शोधणार 

दुसरीकडे, महाविकास आघाडीचं एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी शिवसेना ठाकरे गटाकडून आणि राष्ट्रवादीकडूनही अतिरिक्त जागांसाठी दबाव  आहे. मात्र, विजयी होऊ शकेल, अशा उमेदवारांवरच भिस्त ठेवण्यावर कल आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष फुटल्याने काँग्रेसकडून किती जागा दिल्या जातात, याचेही औत्सुक्य असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या