Kolhapur Municipal Corporation: आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 20 प्रभागांच्या प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण चार लाख 94 हजार 711 मतदारांची नावे या प्रारूप मतदारयादीमध्ये आहेत. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या चाव्या सुद्धा लाडक्या बहिणींच्या हाती असणार आहेत, पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 5 हजाराने जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये लाडक्या बहिणी निर्णय ठरणार आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार प्रभाग क्रमांक 20 हा सर्वाधिक मतदारांचा आहे. 2015 च्या निवडणुकीनंतर जवळपास 41 हजार मतदार वाढले आहेत. ही मतदारयादी जुलै 2025 मध्ये झालेल्या विधानसभेच्या यादीनुसार आधारित आहे.

Continues below advertisement

कोल्हापूर मनपाच्या निवडणुकीमध्ये महिलाच केंद्रस्थानी

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. यामध्ये चार लाख 94 हजार 711 मतदार आहेत. त्यामध्ये दोन लाख 44 हजार 734 पुरुष आहेत. दोन लाख 49 हजार 940 महिला मतदार आहेत. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. विशेष म्हणजे 20 प्रभागांपैकी 15 प्रभागांमध्ये सर्वाधिक महिला मतदार आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांचा निकाल हा लाडक्या बहिणीच्या हाती असणार हे स्पष्ट झालं आहे. महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेसाठी वापरलेली एक जुलै 2025 पर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार 20 प्रभागांसाठी चार लाख 94 हजार 711 मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मते निर्णायक ठरली. त्यामुळे आता कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा तीच स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. महानगरपालिकेसाठी 81 पैकी 41 प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत आणि त्यामध्ये 15 प्रभागांमध्ये सर्वाधिक महिलाच असल्याने कोल्हापूर मनपाच्या निवडणुकीमध्ये आता महिलाच केंद्रस्थानी असतील.

कोल्हापुरात तब्बल 32 हजार दुबार मतदार 

दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 20 प्रभागांमध्ये तब्बल 32 हजार 250 दुबार मतदार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हे मतदार डोकेदुखी ठरणार का अशी स्थिती आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीत दुबार नाव असेल, तर नावापुढे स्टार चिन्ह टाकून मतदारयादी दिल्या आहेत. प्रारुप मतदारयादीवर प्राप्त हरकतींवरून सुनावणी घेतली जाणार आहे. त्यावेळी मतदारांच्या नावांची खात्री करून घेतली जाणार आहे. एकाच नावाची दोन, कुठे तीन, तर कुठे चार सुद्धा मतदार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे खातरजमा करून यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या