कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) चुरशीने मतदान सुरु असतानाच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मतदान केंद्रामध्येच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या महादेव श्रीपती सुतार (वय 69, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) याना मतदार रांगेमध्येच चक्कर आल्याने जागेवर कोसळले. यावेळी त्यांना नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महादेव सुतार मतदानासाठी घरातून बाहेर पडले होते. रमाबाई आंबेडकर शाळेतील केंद्रावर त्यांचे मतदान होते. मतदानासाठी रांगेत उभे असतानाच चक्कर येऊन ते कोसळले. हा प्रकार लक्षात येताच मतदान केंद्रातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी सुतार यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदयविकाराच्या त्यांचे निधन झाले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.


तोल जाऊन पडल्याने वृद्धा जखमी


दरम्यान, भुये (ता. करवीर) येथे मतदान करून मुलाच्या दुचाकीवरून परत जाताना तोल जाऊन पडल्याने वृद्धा जखमी झाली. बालिंगे पाडळी (ता. करवीर) याठिकाणी ही घटना घडली. कमल विलास पोवार (वय 60, मूळ रा. भुये, सध्या रा. बालिंगे पाडळी) असे जखमीचे नाव आहे. सकाळी अकराच्या सुमारास कांचनवाडी (ता. करवीर) येथे घडली. जखमी कमल यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 


कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान 


चंदगड- 271- 37.15 टक्के
कागल- 273-  40.03 टक्के
करवीर -275- 42.12 टक्के
कोल्हापूर उत्तर 276- 37.85 टक्के
कोल्हापूर दक्षिण 274- 35.46 टक्के
राधानगरी- 272- 38.18 टक्के


हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान 


हातकणंगले- 278 – 39.65 टक्के
 इचलकरंजी 279 – 33.77 टक्के
इस्लामपूर- 283- 37.20 टक्के
शाहूवाडी- 277- 35.48 टक्के
शिराळा- 284- 34.98 टक्के
शिरोळ – 280- 35.71 टक्के


दरम्यान, कोल्हापूर महानरपालिका क्षेत्रातील जाधववाडी मनपा शाळेत कोल्हापुरी खाद्यसंस्कृती थीम घेण्यात आली. रांगोळी व बॅनर लावून सजावट करण्यात आली होती. कोल्हापुरात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरातील नेहरूनगर मनपा शाळेत शहीद ही थीम घेण्यात आली. त्याप्रमाणे रांगोळी व बॅनर लावून सजावट करण्यात आली. जिल्ह्यात तृतीयपंथी व्यक्तींकडून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. करवीर तालुका प्रशासनाकडून या सर्वांना गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या