कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur Ganesh Darshan) गणेशोत्सव उत्साह शिगेला पोहोचला आहे. घरगुती गणपती विसर्जन पार पडल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात पुढील चार दिवस वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आली आहे. अनेक ऐतिहासिक, वैज्ञानिक, पौराणिक देखावे साकारले आहेत. 


कोल्हापूर शहरात गंगावेश शिवाजी पेठ परिसरात श्री तरुण मंडळाची गदेवर आरूढ आकर्षक मूर्ती, गोल सर्कल मित्र मंडळाची लालबागचा राजा दरबार, गोल्डस्टार स्पोर्टसचा पावनखिंड सजीव देखावा, निवृत्ती तरुण मंडळाचा बालमित्रांसाठी ॲम्युझमेंट पार्क, नाथा गोळे तालीम मंडळाची काल्पनिक मंदिराची प्रतिकृती,  मित्र प्रेम मंडळ, कपिलतीर्थमध्ये नायनाट स्वराज्यद्रोह्यांचा हा सजीव देखावा, श्री एकदंती तरुण मंडळाची गणरायाला मूषक चौरंगावरून आकाशगंगेची सफर घडवतानाची आकर्षक मूर्ती आकर्षण आहे.


मंगळवार पेठ परिसरात प्रिन्स क्लबचा मुलांच्या आत्महत्येवर तांत्रिक व सजीव देखावा, ब्लड ग्रुपची आकर्षक मयुरारुढ गणेशमूर्ती, श्री तरुण मंडळाची 38  फुटी फायबरची शेषनारायण मुर्तीची प्रतिकृती, स्वस्तिक तरुण मंडळाचे एलईडी बल्बच्या माध्यमातून तिरुपती दर्शन, लेटेस्ट तरुण मंडळाचा दर्याबहाद्दूर सरखेल कान्होजी आंग्रे सजीव देखावा, दत्ताजीराव काशीद चौक मित्र मंडळाचा गठळ्यापासून सावधान विनोदी सजीव देखावा, कलकल ग्रुपची सतराव्या शतकातील पुरातन मूर्ती आहे. तुकाराम माळी तालीम मंडळाची सिंहासनारुढ मूर्ती, पाटाकडील तालीम मंडळाची लालबागचा राजा मूर्ती, जादू ग्रुप, टेंबे रोडला हॉरर गुहा, जय पद्मावती मंडळ, बेलबागेत थायलंडमधील पुरातनकालीन मूर्ती,  न्यू बिनधास्त सांस्कृतिक, क्रीडा मंडळाची केदारनाथ मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी मिळेल. 


महापालिका, लक्ष्मीपुरी परिसरात छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाची एकवीस फुटी महागणपती, संयुक्त छत्रपती शिवाजी चौक मंडळाची आकर्षक मूर्ती,  मेढे तालीम मंडळाचा धनकवडीचे शंकर महाराज देखावा, जनरल मटण फिश मार्केट मंडळाचा संत बाळूमामा देखावा, सोमवार पेठ तरुण मंडळाची गरुडावर स्वार रूपातील मूर्ती, स्वयंभू गणेश मित्र मंडळाची सोशल मीडियाच्या विळख्यातून समाजाला मुक्त करणाऱ्या रूपातील गणेशमूर्ती आकर्षण आहे. तसेच गाईड मित्र मंडळाची ऑक्टोपसवर स्वार गणेशमूर्ती, सत्यनारायण तालीम मंडळाचा कैलास पर्वतातून प्रगट झालेल्या शंकर महाराज यांच्यावरील देखावा, दक्षता तरुण मंडळाची (पोलिस लाईन) प्राचीन काळातील अवतार रूपातील गणेशमूर्ती आकर्षण आहे. राजेश सांस्कृतिक मंडळ (बलराम कॉलनी, सुतारमळा) आकर्षक गणेशमूर्ती, कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची काल्पनिक मंदिराची 15 फुटी प्रतिकृती आकर्षण आहे.


इतर महत्वाच्या बातम्या