Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यामधील 480 ग्रामपंचायतींसाठी ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळा संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. आरक्षणासह अंतिम प्रभाग रचना झाल्याने आता सरपंच आरक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ओबीसी आरक्षणासह अंतिम प्रभाग जाहीर केली आहे. दरम्यान, 70 ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक ओबीसी लोकसंख्या नसल्याने त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण काढण्यात आलेले नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 21 या कालावधीमध्ये संपलेल्या 5 तर डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या 480 ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती व जमाती महिला संवर्ग तसेच ओबीसी आरक्षणाचा अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे.
शहरालगतच्या गावांमध्ये निवडणुकीचा धुरळा
निवडणूक होत असलेली अनेक कोल्हापूर शहराच्या वेशीवरची आहेत. ही गावे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीतही आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. शिंगणापूर, उजळाईवाडी, पाचगाव, आंबेवाडी, उचगाव वळीवडे, कंदलगाव, वसगडे, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, सरनोबतवाडी, गांधीनगर गावांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या