Kolhapur Crime : कोल्हापुरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीला गोड बोलून फिरायला नेऊन डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. स्नेहल नितीन ऐवळे (रा. खडकी ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव असून ती ऊसतोड मजूर होती. थंड डोक्याने खून केल्यानंतर नराधम पती नितीन ऐवळे हा स्वत:हून करवीर पोलिस ठाण्यात (Kolhapur Crime) हजर झाला आणि खुनाची कबुली दिली. पती ऊसतोड मजूर असून तो सोलापूर जिल्ह्यातील आहे. खुनाची घटना कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगे पूलाच्या पाणंद परिसरात झाली.


बांधावरील मोठा दगड उचलून पत्नीच्या डोक्यात घातला


मिळालेल्या माहितीनुसार, नितीन दगडू ऐवळे हा पत्नी स्नेहलसह गुरुदत्त शुगर वर्क्स टाकळीवाडीत ऊस तोडणीचे काम करण्यासाठी (Kolhapur News) आला होता. आपल्या पत्नीचे मोबाईलवरील बोलण्यावरून अनैतिक संबंध असल्याचा संशय नितीनच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने सोमवारी दुपारी मुलांना भेटण्यासाठी पत्नी स्नेहलला घेऊन मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आला. बसस्थानकात बसची वाट पाहण्याचा बहाणा करत सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेळ घालविला. बस नसल्याने दोघे चालत फिरत फिरत कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर बालिंगे पुलाजवळ आले. दिवसभर कंटाळा आल्याने शेताच्या बांधावर आराम करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. आराम करत असतानाच दोघांना झोप लागली. पहाटे पाच वाजता नितीन उठला. त्यावेळी पत्नी स्नेहल गाढ झोपेत होती. त्याने बांधावरील मोठा दगड उचलून त्याने पत्नीच्या डोक्यात घातला. यावेळी स्नेहलच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 


खून केल्यानंतर आरोपी नितीन मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास (Kolhapur Crime) पहिल्यांदा लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने पत्नीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला करवीर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. करवीरचे पोलिस निरीक्षक रवी पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक काळे,पोलीस उपनिरीक्षक निवास पवार, विक्रांत चव्हाण, रवी पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी याबाबत संबंधित महिलेच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी भेट दिली.


इतर महत्वाच्या बातम्या