Kolhapur Crime : : पोहता येत नसतानाही पाय घसरून खणीत पडलेल्या लेकीला वाचवलं, पण तोल गेल्याने बाप बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना कोल्हापूर (Kolhapur News) शहरापासून जवळच असलेल्या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीत घडली. सतीश दत्तात्रय गोंधळी (वय 45) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे. पोहता येत नसतानाही सतीश यांनी लेकीचा जीव वाचवला, पण ते पाण्यात बुडाले. पत्नीने  आरडाओरडा केल्याने तेथून जात असणाऱ्या एकाने त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये (Kolhapur Crime) दाखल करण्यात आले, पण डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे गोंधळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.


मन हेलावणारी घटना गडमुडशिंगीत रविवारी दुपारी घडली. मयत सतीश गोंधळी, पत्नी सिंधू आणि शाळकरी मुलगी तृप्तीसोबत घरातील धुणं धुण्यासाठी गावातील खणीवर गेले होते. यावेळी मुलगी कपडे धुण्यासाठी मदत करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागली. त्यामुळे वडिलांनी पोहता येत नसतानाही पाण्यात उतरून मुलीला बाहेर काढल्याने ती बचावली. मात्र, त्यांचा तोल गेल्याने पाण्यात बुडाले. पती बुडू लागताच पत्नीने आरडाओरडा केला. मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून अंत झाला.


रस्त्यावर महापालिकेच्या पाण्याच्या टँकर खाली महिलेचा मृत्यू 


दरम्यान, रविवारीच कोल्हापूरच्या (Kolhapur Crime) मध्यवर्ती बिंदू चौकात सबजेल रस्त्यावर महापालिकेच्या (Kolhapur Crime) पाण्याच्या टँकर खाली गेल्याने रेखा अभिनंदन शहा यांचा मृत्यू झाला. रेखा या मुलगा मेहुलच्या मोटरसायकलवरून जात असताना अपघात झाला. रेखा शहा त्यांच्या मुलासोबत देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. बिंदू चौकात रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या वाहनाला शहा यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने शहा रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी पाठीमागून आलेला टँकरखाली रेखा आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


कोल्हापुरात एकाच दिवशी तीन आत्महत्या 


दरम्यान, रविवारी कोल्हापूर शहराच्या (Kolhapur Crime) उपनगरामध्ये एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केली. पाचगाव, मोरेवाडी आणि नागावमध्ये आत्महत्येच्या घटना घडल्या. आर. के. नगरमधील दीपक करमचंद रयत (वय 50, गणेश नगर, रुमाले माळ) यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. मोरेवाडीत तेजस प्रशांत यादव (वय 19, रा. म्हाडा कॉलनी) या तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. तेजस हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. तिसरी घटना हातकणंगले तालुक्यातील नागावात घडली. नुरमहमंद साहेबजी मुल्लाणी (वय 42) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. 


इतर महत्वाच्या बातम्या