Kolhapur News : कोल्हापूर (kolhapur crime) जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरच्या विकृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. या बोगस डॉक्टरचे नाव समोर आलं नसलं तरी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी मुरगूडच्या (Murgud) शेकडो नागरिकांना निनावी पत्रं (Letter)  आली आहेत. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. निनावी पत्र आणि बोगस डॉक्टरच्या अनेक क्लीप व्हायरल झाल्याची चर्चा आहे.  


या विकृत डाॅक्टरने त्याचा लॅपटाॅप दुरुस्तीसाठी दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. त्याने लॅपटाॅपमध्ये अनेक क्लिप संग्रही करून ठेवल्या होत्या. यामधील अनेक क्लिप सोशल मोबाईलवर पसरल्या आहेत. त्यानंर निनावी पत्र महिलांनी लिहिल्याने दबून असलेली जाहीरपणे समोर आली. दरम्यान, पोलिस ठाण्यात अजून तक्रार देण्यात आलेली नाही. 


निनावी पत्रात काय म्हटले आहे? 


मुरगुडचे नाव आता वेगळ्या कारणासाठी गाजत आहे. येथील बोगस डॉक्टरने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या अश्लील चाळ्यांचे चित्रण करून मुरगुडीचे नाव बदनाम केलं आहे. डॉक्टर हा पेशंटच्या दृष्टीने देव माणूस असतो. परंतु, या बोगस डॉक्टरने आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या आडून हा गैरप्रकार करून या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात कलंक लावला आहे.


ही अवलाद आपल्या मुरगुडच्या भावी पिढीसाठी घातक आहे. सर्व देश महिला दिन साजरा करत महिलांचा सन्मान करून त्यांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करत आहे. त्यामुळे आपल्या मुरगुडमध्ये महिला सुरक्षित नाहीत असा संदेश या घटनेमधून जात आहे. अशा प्रकारचे अश्लील चाळे चित्रण करून ते जतन करून ठेवणाऱ्या विकृत अप्रवृत्तीस आपण सर्व मुरगुडकर कायमचा धडा शिकवूया. जेणेकरून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना आपल्या मुरगुडमध्ये होणार नाहीत याची खबरदारी आपल्यावर आहे. या बोगस डॉक्टरला पाठबळ देणाऱ्यांचा सुद्धा आपण सर्वजण कायमस्वरूपी बंदोबस्त करून मुरगूड शहरात महिला सुरक्षित आहेत असा संदेश सगळे पाठवूया.  


दरम्यान, मुरुगुडमधील अनेक महिला भगिनी असा उल्लेख पत्राच्या शेवटी करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा बोगस डाॅक्टर सोशल मीडियावरून जाहिरात करत होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह परभागातूनही त्याच्याकडे उपचारासाठी येत होते.  


इतर महत्वाच्या बातम्या