Kolhapur Crime : हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) हातकणंगले तालुक्यातून एकाला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या एका महिलेला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कासारवाडी (ता. हातकणंगले) मधील एका हॉटेलमध्ये वेश्‍या व्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. संशयित हनुमंत दिलीप खर्जे (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यामध्ये काही लॉज, मसाज सेंटरला वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 


दरम्यान, अटक करण्यात आलेल्या हनुमंत खर्जेविरोधात कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पथकाने त्याचा ताबा शाहूपुरी पोलिसांकडे दिला आहे. लॉज, मसाज सेंटरला वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती होती. त्यानुसार हनुमंत खर्जे हा त्याच्याच रिक्षातून काही तरुणी पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कासारवाडीत कारवाई करण्यात आली. 


अल्पवयीन मुलीची सुटका  


दुसरीकडे,एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेसही पथकाने ताब्यात घेत पीडिताची सुटका केली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल होता. त्यानुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका महिलेस ताब्यात घेतले. नफिसा समीर दानवाडे (रा. गोकुळ चौक, इचलकरंजी) असे तिचे नाव आहे. तिचा ताबा कुरुंदवाड पोलिसांकडे देण्यात आला आहे.


पतीने घरातच वेश्या अड्डा सुरु केला


दरम्यान, याच महिन्यात 1 मार्च रोजी पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्या अड्डा सुरु केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur) उघडकीस आली होती. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बालिंगा (ता. करवीर) येथे छापेमारी करत वेश्या अड्ड्यावर कारवाई करत पीडित महिलेची सुटका करण्यात आली होती.  पोलिसांकडून पतीला अटक करण्यात आली आहे. बालिंगा परिसरात एका घरातच वेश्या अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छापा टाकला असता पतीकडूनच पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत वेशा अड्डा चालवल्याचे समोर आले. पीडित महिला आणि तिचा पती दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. 


दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापुरात वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून दोघा तरुणांना अटक केली होती. एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे हा प्रकार घडला होता.


इतर महत्वाच्या बातम्या