कोल्हापूर : राज्याला पुरोगामी विचारांचा वारसा देणाऱ्या कोल्हापूरची वाटचाल (Kolhapur Crime) यूपी बिहारच्या दिशेनं चालली आहे का? अशी विचारण्याची वेळ आली आहे. कोल्हापुरात (Kolhapur) खुनाच्या आरोपातील गुंड अमर मानेचा जेलमधील एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अगदी हिरो असल्यासारखा व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून कोल्हापुरात गुंडांना पुजण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली? असा संताप निर्माण करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. आजवर अनेकवेळा कळंबा जेलची अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे जेलमध्ये गांजासह मोबाईल सुद्धा खुलेआम वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


व्हायरल व्हिडिओ कोल्हापूरच्या कळंबा जेलमधील आहे की बिंदू चौकातील जेलमधील आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आता सुरु झालं आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा जेलमध्ये कैद्यांकडून मोबाईलचा खुलेआम वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कारागृह प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. बिंदू चौक जेलच्या तुलनेत कळंबा जेलमध्येच खून, हाणामारी, पोलिसाकडून अत्याचार, गांजा आत फेकण्याचा प्रयत्न, गांजा नेण्याचा प्रयत्न, झाडाझडतीमध्ये गांजा सापडणे, पोलिसानेच गांजा पुरवणे आदी घटनांमुळे कळंबा जेलची लक्तरे यापूर्वीच वेशीवर टांगली गेली आहेत. 


कुमार गायकवाडच्या खून प्रकरणात अमोल माने आरोपी 


दरम्यान, कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार असलेल्या कुमार गायकवाडचा गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भररस्त्यात पाठलाग करून रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. गँगवॉरमधून ही घटना झाली होती. कोल्हापुरात टाकाळा खणीजवळ ही घटना घडली होती. हल्लेखोरांनी 17 वार करत कुमारचा खून केला होता. कुमार मामाकडे आईसह राहत होता. कुमारवर सुद्धा मारामारी, खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल होते. बिंदू चौक सबजेलमधून बाहेर पडतानाचा त्याचा एक व्हिडीओही त्यावेळी व्हायरल झाला होता. त्याने ‘किंग ऑफ कोल्हापूर’ अशा नावाचे एक इन्स्टाग्राम अकाऊंट काढले होते.  


इतर महत्वाच्या बातम्या