कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पक्षाला तगडा हादरा बसला असून माजी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी तुतारी फुंकण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आज त्यांनी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत तुतारी हातामध्ये घेत असल्याचं जाहीर केलं. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा पोहोचले. जयंत पाटील यांनी कागलमध्ये पोहोचण्यापूर्वी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांव भाष्य केलं. 


जयंत पाटील म्हणाले की समरजितसिंह घाटगे यांचा मला सकाळी फोन आला होता. मात्र, उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा दिल्याने आज भेटायला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्रातील आणखी नेते काही संपर्कात आहेत का? असे विचारण्यात आले असता जयंत पाटील यांनी सांगितले की आता सध्या तरी कोणी संपर्कात नाही. आत्ताच त्या बाबतीत बोलणे योग्य होणार नाही. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार के. पी. पाटील आणि आपली दोन वेळा भेट झाली असल्याची माहिती सुद्धा जयंत पाटील यांनी यावेळी दिली. 


एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये बरीच मजल मारली


म्हणाले की सरकारच्या पैशावर लाडकी बहीण योजना कधी केली जात आहे, पण राज्यातील महिला, लहान मुली सुरक्षित नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.  महिला सुरक्षित नसतील तर कोणतीच मदत उपयोगाची नसल्याचे ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षेकडे, अत्याचाराकडे दुर्लक्ष केले तर चालतं अशा पद्धतीने पोलीस वागत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. 


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये बरीच मजल मारली असली तर ते म्हणाले. त्या दोघांनाही त्यांनी मागे टाकलं असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंनी दिल्ली काबीज केल्याने इतर दोघांचे फार चालत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कार्यकर्त्यांना कळालं असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे परिस्थिती हळूहळू बदलत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितलं. 


ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून विचारण्यात केली असता जयंत पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. साखर कारखानदारांवरून जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले की साखर कारखानदारांना सत्ताधारी आपल्या बाजूने येण्यासाठी दबाव टाकत आहेत. कर्ज प्रकरण असतील तर कारखानदारांची प्रकरण थांबवली जातात. सरकारकडून पक्षपातीपणाने काम केला जात असल्याची टीका पाटील यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या