Kolhapur Jaggery : कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गूळ सौदे बंद राहिले. 50 टक्के मजुरी वाढच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने गूळ सौद्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी यंदाच्या गूळ हंगामात दोन महिन्यांत दुसऱ्यांदा गूळ सौदे बंद पडले आहेत दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. दुसरीकडे हमालांच्या काम बंद आंदोलनामुळे गुळ सौदे बंद पडले आहेत.
दरम्यान, बाजार समितीने मंगळवारी सायंकाळी माथाडी कामगारांची बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, माथाडी कामगार मागणीवर ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली होती. त्यामुळे आजही सौदे बंद राहिले. दरम्यान, यार्डातील गूळ सौद्यात 5 हजार गूळ रव्यांची आवक होत असून 3 हजार रव्यांचे सौदे पूर्ण झाले आहेत. माथाडी कामगारांनी 50 टक्के मजुरी वाढीची मागणी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे माथाडी सौदे सोडून गेले. त्यामुळे गूळ भरणे, उतरणे, तोलाई काम ठप्प झाले. माथाडी कामगारांची समजूत काढण्यासाठी बाजार समिती प्रशासक मंडळाकडून मंगळवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत माथाडी कामगारांनी मजुरी वाढीची मागणी लावून धरली.
50 टक्के मजुरीवाढीवर माथाडी ठाम
माथाडी कामात गूळ रव्यांची भरणी उतरणी, तोलाई, पॅकिंग, थप्पी लावण्यासाठी मजुरी दर माथाडी बोर्ड, बाजार समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार 30 किलोच्या रव्यांसाठी 6 रुपये 58 पैसे सध्या मजुरी मिळते. यात 50 टक्के वाढ करावी, पुढील तीन वर्षांसाठी वाढ असावी, अशी मागणी माथाडींनी केली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. दुसरीकडे हमालांच्या काम बंद आंदोलनामुळे गुळ सौदे बंद पडले आहेत.
यापूर्वी, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाला किमान 3700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गुळ सौदे बंद पाडले होते. तीन दिवसांनी मार्केट यार्डात गुळाचे सौदे पूर्ववत सुरु झाले होते. 22 नोव्हेंबर रोजी गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकात तयार झालेला गूळ हा कोल्हापूरचा गूळ म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्रीला येत असल्याचे समोर आणले. कर्नाटकी गुळाची पोलखोल शेतकऱ्यांनी प्रशासकांसमोर केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या