Sumangalam Panchamabhut Mohotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगल पंचमभूत महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे निमंत्रण स्वीकारल्यास पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत व्यासपीठावर असतील. (Sumangalam Panchamabhut Mohotsav at kaneri Math) बोम्मई यांनाही निमंत्रित करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. सीमावादावर आणि महाराष्ट्राविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करत सुटलेल्या बोम्मई यांना निमंत्रण दिल्याने भूवया उंचावल्या आहेत. (Invitation to CM Basavraj Bommai for Sumangalam Panchamabhut Mohotsav)


अद्रुष्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मठात दररोज सुमारे 5 लाख लोक येतील आणि 1 लाखांहून अधिक पर्यटकांच्या मुक्कामाची तयारी करण्यात आली आहे. स्वामी स्वत: अनेक संस्था, विद्यापीठे आणि संस्थांना भेटी देऊन निमंत्रणे देत आहेत. (Sumangal Panchamabhut Mohotsav) आयोजकांच्या म्हणण्यानुसार, मोदींनी निमंत्रण स्वीकारणे जवळजवळ अंतिम आहे, परंतु औपचारिक घोषणा नंतर केली जाईल. मुख्यमंत्री, आठ राज्यांचे राज्यपाल, सुमारे 800 कुलगुरू आणि साधू संत यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आयोजकांनी दावा केला आहे की हा कार्यक्रम या आतापर्यंतचा सर्वात भव्य कार्यक्रम असेल.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. यावेळी कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या  दरम्यान, सुमारे 1350 वर्षांपेक्षा अधिक काळ अध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'सुमंगलम' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होईल. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरूप असेल. 


'सुमंगलम' महोत्सव आहे तरी काय?



  • महोत्सवात एकूण 1 हजार स्टॉल उभारणार

  • प्रत्येक राज्यातील कमीत कमी दोनशे पर्यावरणवादी, अभ्यासू लोकांचा सहभाग

  • दोनशे डॉक्टर मिळून आयुर्वेदीक गॅलरी उभारणार व त्याबाबत माहिती देणार

  • देशी बीजांचे एकत्रित प्रदर्शन भरवणार

  • पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी, दुचाकी मेस्त्री, पंक्चर सेवा

  • महोत्सव व पार्किंगसाठी 500 एकर जागा

  • एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशभरातील छोट्या अवजारांचे प्रदर्शन

  • गृहिणी व बेरोजगारांसाठी कुटिरोद्योगांचे प्रदर्शन

  • स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र ॲपची निर्मिती


इतर महत्वाच्या बातम्या