कोल्हापूर : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (Keshavrao Bhosle Natyagruha) पुनर्बांधणीसाठी आज (12 ऑगस्ट) खासदार शाहू छत्रपती यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने भलताच प्रसंग पाहायला मिळाला.
तर मी सर्वात आधी मी तुमच्या अंगावर येईन
संभाजीराजे छत्रपती यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हात वारे करत या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास सर्वात आधी मी तुमच्या अंगावर येईल अशा शब्दात दम भरला. शाहू छत्रपती यांनी बोलावले असली तर तरीही कामात कोणताही गैरप्रकार झाल्यास मी यासाठी तुम्हालाच जबाबदार धरणार असं संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांना दरडावलं. संभाजीराजे छत्रपती यांचा अचानक झालेला हा रुद्रावतार पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले. या प्रकारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र या सगळ्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणं पसंत केलं.
हसन मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये
काही दिवसापूर्वीच विशाळगडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे यांनी देखील हसन मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये अशा शब्दात मुश्रीफ यांना फटकारलं होतं. विशाळगड प्रकरणानंतर आता केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या निमित्ताने देखील संभाजी राजे आणि हसन मुश्रीफ वाद वाढत असल्याच्या चर्चा या निमित्ताने कोल्हापुरात रंगल्या आहेत.
नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार
दरम्यान, दुर्दैवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला निधी वेळेअभावी न मिळाल्याने काम थांबले ही अडचण येवू देणार नाही, निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. त्यांनी आगीमुळे नुकसान झालेल्या नाट्यगृहाची कोल्हापूर येथे पाहणी केली, त्यावेळी उपस्थित कलावंतांशी संवाद साधाला. ते म्हणाले, ऐतिहासिक वास्तूचे जसे बारकावे असतात तसेच पुन्हा करण्यासाठी या कामाला वेळ लागू शकतो परंतु कामे चांगली करण्यात येतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर करण्यात येणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या निधीपेक्षा जरी जास्त निधी लागला तरी तो दिला जाईल, मात्र नाट्यगृह पुर्वीसारखे पुन्हा तयार झाले पाहिजे अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.
इतर महत्वाच्या बातम्या