Samarjeetsinh Ghatge Vs Hasan Mushrif : कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापासूनच रणधुमाळी सुरू झाली आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागल दौऱ्यामध्ये थेट हसन मुश्रीफ यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर करताना भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्या विरोधात अधिकृत आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ असा असा थेट सामना रंगणार असला, तरी या लढतीमध्ये समरजित मात्र कोणाच्या बाजूने असतील याची चर्चा रंगली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गळ घातली जात आहे. मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने घाटगे कागलमधून कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. आठ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताना हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता घाटगे यांच्या भूमिकेची चर्चा रंगू लागली आहे.


समररिजत घाटगे तुतारी फुंकणार का? 


दरम्यान स्वतः शरद पवार यांनी समरजित घाटगे यांच्याशी दोन वेळा संपर्क साधल्याची माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. मात्र, याबाबत समरजित घाटगे यांनी आपला पत्ता खोललेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून समरजित घाटगे यांची ओळख आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही परिस्थितीत आमदार व्हायचं याच ताकदीने त्यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे ते विधानसभेच्या रिंगणात असणार हे 100 टक्के खरं असलं तरी, कोणाकडून असणार याचा पत्ता मात्र अजून स्पष्ट झालेला नाही. अशा स्थितीत अशा स्थितीत घाटगे तुतारी फुंकणार का? अशी सुद्धा चर्चा आहे.


अजित पवार रविवारी बोलताना म्हणाले की हसन मुश्रीफांना इतक्या उच्चांकी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी सुद्धा कागलमधील विविध विकासकामांचे लोकार्पण करताना आपण केलेल्या कार्याचा आढावा घेतला. हा आढावा घेत असतानाच विकासकामांवरील खर्च पाहून विरोधकांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी सुद्धा टीका केली. त्यामुळे मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा सामना विधानसभेला रंगल्यास घाटगे कोणाकडून असतील याचीच उत्सुकता आहे. 


2019 मध्ये समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफांना जोरदार टक्कर दिली होती. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना 88 हजारांवर मते मिळवली होती. मुश्रीफ यांना 1 लाख 17 हजारांवर मते मिळाली होती. संजय बाबा घाटगे यांनी 55 हजारांवर मते मिळाली होती. दुरंगी लढतीमधील धोका पाहता कागलमध्ये तिरंगी लढत कशी होईल, याकडे सातत्याने हसन मुश्रीफ यांचा कल राहिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या