Drama Song Bhavageeth Singing Competition : कोल्हापूरमध्ये शुक्रवारपासून राज्यस्तरीय नाट्यगीत, भावगीत गायन स्पर्धा (Drama Song Bhavageeth Singing Competition) रंगणार आहेत. सलग तीन दिवस स्पर्धा होणार आहे. रोज सायंकाळी मैफलही रंगेल. न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित स्वर्गीय मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचकडून स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हौशी कलावंतांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेच्या मागचा मुख्य उद्देश आहे.  


संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृह, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात स्पर्धा व संगीत मैफील होईल. या स्पर्धेसाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सकाळच्या सत्रात प्रत्येक गटाच्या भावगीताच्या स्पर्धा आणि दुपारच्या सत्रात नाट्य गीताच्या स्पर्धा पार पडतील. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 200 रुपये इतके आहे.


या वयोगटात होणार स्पर्धा


लोहिया म्हणाले की, ‘सलग 9 व्या वर्षी हा उपक्रम होणार असून विविध गटांत स्पर्धा (Drama Song Bhavageeth Singing Competition) होतील. बाहेरील स्पर्धकांसाठी निवास व प्रवास खर्चाची सुविधा दिली जाणार आहे. 9 ते 14, 15 ते 35, 36 ते 55 या वयोगटात स्पर्धा होतील. 9 ते 14 वयोगटासाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार तर उर्वरित दोन गटासाठी अनुक्रमे 10 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पारितोषिके दिली जातील.शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता स्वरसांगाती प्रस्तुत ‘त्रिवेणी’ ही मैफल रंगणार असून डॉ. शीतल धर्माधिकारी, डॉ. भाग्यश्री मुळे, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर यांचा स्वरसाज असेल. शनिवारी ‘स्वरनक्षत्र’ ही मैफल रंगणार असून सुरंजन खंडाळकर, अभिषेक पटवर्धन, स्वरदा गोडबोले, कल्याणी जोशी यांचा स्वरसाज असेल. रविवारी ‘रंगी रंगला श्रीरंग’ ही मैफल सजणार असून पं. रघुनंदन पणशीकर, अपर्णा केळकर यांचा स्वरसाज असेल. विघ्नेश जोशी यांचे निरुपण असेल. 


या स्पर्धेसाठीची प्रवेशिका भरून पोस्टाने किंवा संस्थेच्या www.neskolhapur.com या वेबसाईटवरून ऑनलाईन भरता येतील. अधिक माहितीसाठी सतीश कुलकर्णी 9326499910 किंवा डॉ. शीतल धर्माधिकारी 9326009386 यांना संपर्क साधता येईल.या स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत दिनांक 5 जानेवारी आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या