Shivrajyabhishek Din: युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापुरात पहिल्यांदाच नवीन राजवाड्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. याबाबती छत्रपती घराण्याकडून देण्यात आली आहे. सहा जून रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होईल. मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी दिनांक 6 जून 2023 रोजी सकाळी साडे सात ते दहा या वेळेमध्ये नवी राजवाड्याच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होईल, याबाबतची माहिती छत्रपती घराणे कडून देण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सौ याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती तसेच निमंत्रित आणि मंडळी उपस्थित राहणार आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम खालील पद्धतीने होतील
- सकाळी साडेसात वाजता सनई चौघडा वादन
- आठ वाजता झांजपथकाचा कार्यक्रम
- साडेआठ वाजता मराठा लाईट इन्फंट्री बँड, बेळगाव यांचे वादन
- नऊ वाजता शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक
- सव्वानऊ वाजता पोवाड्याचा कार्यक्रम
- साडेनऊ वाजता शौर्य गीते सादर केले जातील
- पावणेदहा वाजता मराठा स्फूर्ती गीत
- 9 वाजून 50 मिनिटांनी मर्दानी खेळ
संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्यातील लाखो शिवभक्तांसाठी एक सोहळा असतो.
राज्यभरातून लाखो शिवभक्तांची मांदियाळी 6 जून रोजी रायगडावर हजर होत असते. दरम्यान, 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुर्वतयारीची पाहणी संयोगीताराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यावेळी गडावरील कचरा शिवभक्तांसोबत गोळा करुन खाली आणण्यात आला. दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमूर्तीला अस्सल सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या