कोल्हापूर : काँग्रेस (Congress) काय आहे हे मला चांगलं माहिती आहे, काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मानत नाहीत, असे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी कोल्हापुरात केले. देवरा यांनी कोल्हापूरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभा राहील, अशी प्रतिक्रिया दिली. संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात, असेही ते म्हणाले. 


काँग्रेसने दलितांमधील केवळ एक उमेदवार दिला


देवरा यांनी सांगितले की, वर्षा गायकवाड ही माझी बहिण आहे. माझे वडील आणि वर्षा गायकवाड यांच्या वडिलांचे जुने संबंध होते. काँग्रेसने दलितांमधील केवळ एक उमेदवार दिला त्यामुळे काँग्रेसची भूमिका दलित विरोधी आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे. पूर्ण राज्यात काँग्रेसवर खूप नाराजी आहे. महाविकास आघाडी संधी साधू आघाडी असल्याचे देवरा म्हणाले. 


महाविकास आघाडीतील पक्ष खोक्यासाठी, खुर्चीसाठी एकत्र आले


ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नका म्हणून मी काँग्रेसला त्यावेळी वारंवार सांगत होतो. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून दिल्लीतील कोणत्याही नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना कधी अभिवादन केलं नाही. महाविकास आघाडीतील पक्ष खोक्यासाठी, खुर्चीसाठी एकत्र आले.  






मी सर्व सामान्य नागरिकांना घरं देण्याचा प्रयत्न केला


ते म्हणाले की, मुंबईत सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे घरांचा आहे. मी सर्व सामान्य नागरिकांना घरं देण्याचा प्रयत्न केला, पण खासदार अरविंद सावंत यांच्या इमारतीची ओसी नाही, तर अरविंद सावंत गोरगरीब जनतेला घरं काय देणार? अशी  विचारणा त्यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या