Raju Shetti : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. कोल्हापूर हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. निकालानंतर त्यांना कळेल, आम्ही निवडणूक जिंकली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केलं. हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी यांनी आज इचलकरंजीमध्ये पदयात्रा केली. या पदयात्रेदरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ते एबीपी माझाशी बोलत होते.


हजारो कार्यकर्त्यांसोबत राजू शेट्टींचं जोरदार शक्ती प्रदर्शन


राजू शेट्टींनी हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज इचलकरंजीमध्ये पदयात्रा केली. पदयात्रे दरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर ते एबीपी माझाशी बोलत होते. शाहू चौकावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि महाविकास आघाडीची रॅली समोरासमोर आली होती. खरं पाहिलं तर आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी आमच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन केलं आहे. आम्ही निवडणूक जिंकली आहे असं राजू शेट्टी म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


Raju Shetti : शेतकऱ्यांचं कुंकू वाचवण्याचं काम राजू शेट्टींनी केलंय, म्हणून आम्ही बहिणीसारखं पाठबळ देतोय; पगार विचारताच महिला कार्यकर्त्यांचे उत्तर