Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 53 गावांमध्ये रणधुमाळी सुरु होती. या ग्रामपंचायती करवीर आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 12 पैकी 10 ग्रामपंचायतींमध्ये  विजयाचा दावा केला आहे.  


कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव आणि मोरेवाडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता राखली आहे. आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस आघाडीच्या सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पाचगावच्या सरपंचपदी प्रियांका संग्राम पाटील, मोरेवाडीच्या सरपंचपदी आनंदा कांबळे हे निवडून आले आहेत. वाकरे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी अश्विनी चंद्रकांत पाटील विजयी झाले आहेत. कंदलगावमध्ये सरपंचपदाचे उमेदवार राहुल वसंत पाटील विजयी झाले आहेत. 


गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर 


कोल्हापूर दक्षिणमधील गांधीनगर ग्रामपंचायतीत महाडिक गटाचा विजय झाला आहे. सरपंचपदी महाडिक आघाडीच्या संदीप पाटोळे यांचा विजय झाला आहे. दरम्यान, करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा, सादळे मादळे, वरणगे, हसूर, सावर्डे दुमाला, हिरवडे दुमाला, वडणगे कांडगाव या गावांमध्ये सत्तांतर झाले आहे. दुसरीकडे दऱ्याचे वडगाव, कावणे, दिंडनेर्ली, पाडळी बुद्रुक आणि सोनाळीत सत्ता अबाधित आहे. 


शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा


Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : शिरोळ तालुक्यामध्ये 17 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखला आहे. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत 17 पैकी 10 ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला, पण यड्रावकर गटाच्या समर्थकांनी चिवट झुंज देत विजय खेचून आणला. 


इतर महत्वाच्या बातम्या