Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायती आणि 413 सरपंचपदासाठी आज 12 तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. कागल तालुक्यात मुश्रीफांना मोठ्या गावांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आपला गड राखला आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांनी 12 पैकी 10 गावांमध्ये विजय मिळवला आहे. शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला ग्रामपंचायती गेल्या आहेत. चंदगड तालुक्यातील शिनोळीत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रचार केला होता. मात्र, त्या ठिकाणी शिंदे गटाचा पराभव झाला आहे. 


शाहूवाडी तालुक्यात काय स्थिती?


शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे, चरण, साळशी, खुटाळवाडी, वरेवाडी, वारणा कापशी, हरुळेवाडी, भेडसगाव, कोतोली, रेठरे, विरळे, खेडे, या गावांमध्ये शिवसेना राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. गोगवे, पिशवी, शिवारे गावांमध्ये जनसुराज्य-काँग्रेस आघाडीकडे सत्ता गेली आहे.


राधानगरी तालुक्यातील विजयी सरपंच



  • अकनुर - सुषमा गणेश कांबळे

  • मल्लेवाडी - दिनकर दत्तात्रय खाडे

  • करंजफेण - जयश्री संतोष वागरे

  • हसणे - पूजा शरद पाटील 

  • कारिवडे - प्रवीण मधुकर पाटील 

  • सुळंबी - सुरेखा प्रदीप गुरव

  • पिंपळवाडी - महादेव बापू जाधव 

  • घोडेवाडी - मनीषा संभाजी किरोळकर 

  • मुसळवाडी - आशा सुनील महाडिक 

  • मांगोली - नेताजी कुंडलिक पाटील

  • कांबळवाडी - अनिता सुरेश कुसाळे 

  • कासारपुतळे - सुनीता शंकर पवार

  • तळगाव - कृष्णा ज्ञानू पाटील 

  • मजरे कासारवाडा - योगिता युवराज वागरे

  • कपिलेश्वर - शहाजी बाजीराव पाटील

  • शिरसे - निकिता प्रवीण कांबळे 

  • तारळी खुर्द - सरिता युवराज पौंडकर


गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचपदाचे विजयी उमेदवार 



  • जखेवाडी -वैशाली गिरी

  • तारेवाडी - विश्रांती नाईक 

  • शिरपूर तर्फ नेसरी -सचिन गुरव

  • यमहट्टी - संगीता नामदेव धुमाळे

  • डोनेवाडी - सिकंदर मुल्ला 

  • हडलगे - हणमंत पाटील 

  • काळामवाडी - सरिता लांडे 

  • वैरागवाडी - पी. के. पाटील

  • बिद्रेवाडी - दत्तात्रय गुरव 

  • नंद्याळ - मनीषा सुरेश कांबळे

  • फराकटेवाडी - शीतल फराकटे  

  • दौलतवाडी - शीतल जाधव 


चंदगड तालुक्यातील शिनोळीत शिंदे गटाचा पराभव


दरम्यान, चंदगड तालुक्यातील शिनोळीत राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवली आहे. एकूण 9 पैकी 7 जागा जिंकत राजेश पाटील आणि भरमु सुबराव यांनी सत्ता मिळवली. शिनोळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रचार केला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा या निवडणुक निकालाकडे लागल्या होत्या. शिनोळी गाव बेळगावला लागून आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या