Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकालाची नोंद  गटातटाचे सर्वाधिक राजकारण असणाऱ्या कागल तालुक्यात झाली आहे. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना या निवडणुकीतून धक्का बसला आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 15 गावात सतांतर झाले आहे. दुसरीकडे 11 गावचे कारभारी सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.


तालुक्यात आमदार हसन मुश्रीफ गटाचे 7, खासदार संजय मंडलिक गटाचे 7, समरजितसिंह घाटगे गटाचे 6, माजी आमदार संजय घाटगे गटाचे 4 तर प्रविणसिंह पाटील गटाचे 2 ठिकाणांवर थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवार विजयी झाले. समरजितसिंह घाटगे गटाने मागील निवडणुकीतील तीनवरून सहा ठिकाणी सरपंचपदी यश मिळवलं आहे. मुश्रीफ गटाला मागील निवडणुकीत 10 गावांमध्ये विजयी झाले होते, पण यावेळी तीन जागा कमी होऊन 7 ठिकाणांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. मंडलिक गटाला आहे त्या जागांवर समाधान मानावे लागले. 


कागल तालुक्यातील सरपंच 



  • बाळेघोल - सिरसाप्पा दुडाप्पा खतकल्ले

  • बामणी - अनुराधा मारुती पाटील

  • बेलेवाडी काळम्मा - अबोली दशरथ कांबळे

  • फराकटेवाडी - शितल रोहित फराकटे

  • हणबरवाडी सोनाली पांडुरंग कसलकर

  • पिराचीवाडी - कल्पना सुभाष भोसले

  • आणूर - काकासाहेब मारुतीराव सावडकर

  • निढोरी - शुभांगी योगेश सुतार

  • जैन्याळ - लिलाबाई देवबा गुरव

  • मुगळी - मेघा कृष्णात पाटील

  • दौलतवाडी - शितल संदेश जाधव

  • बाचणी - जयश्री उत्तम पाटील

  • नंद्याळ - मनीषा सुरेश कांबळे

  • हसुर बुद्रुक - शितल अशोक लोहार

  • चिमगांव - दीपक यशवंत आंगज

  • बोरवडे - जयश्री केदार फराकटे

  • करड्याळ - प्रियांका प्रकाश पाटील

  • हमिदवाडा - कृष्णात बाबुराव बुरटे

  • रणदेवीवाडी - राहुल संपतराव खोत

  • अवचितवाडी - वेदिका संभाजी गायकवाड

  • कसबा सांगाव - वीरश्री विक्रमसिंह जाधव

  • बोळावी - सागर ज्ञानदेव माने

  • अर्जुनवाडा - सुरेखा शहाजी लुगडे

  • ठाणेवाडी - श्वेता भरत घोटणे

  • व्हनाळी - दिलीप रामचंद्र कवडे 

  • कापशी सेनापती - उज्वला गंगाधर कांबळे


इतर महत्वाच्या बातम्या