Shoumika Mahadik on Satej Patil : 'गोकुळ'मध्ये (Gokul) राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या चाचणी लेखापरीक्षणावरून आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेनंतर शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनीही जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या 25 वर्षात त्यांनी स्वत:हून किती चौकशा लावल्या होत्या? गेल्या 25 वर्षांमध्ये गोकुळची 400 कोटींवरून उलाढाल 3 हजार कोटींवर गेली, यावरूनच कळेल की ऑडिट लावायचं की नाही, त्यांची तुलना दोन वर्षात करा, यांनी आयत्या पीठावर रेगोट्या ओढण्यापलीकडे काही केलं नाही, अशा शब्दात शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील यांचा समाचार घेतला.


गोकुळमध्ये लेखापरीक्षणाची मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतर दोन दिवसात चौकशीचे आदेश आले. यानंतर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या टीकेचा शौमिका महाडिक यांनी समाचार घेतला. 


सतेज पाटलांचं नाॅलेज फक्त टँकर


शौमिका महाडिक म्हणाल्या की, "तुम्ही किती चौकशी लावल्या? 25 वर्षात 400 कोटींवरून उलाढाल 3 हजार कोटींवर गेली, यावरूनच कळेल हा ऑडिट लावायचं की नाही, त्यांची तुलना दोन वर्षात करा यांनी आयत्या पीठावर रेगोट्या ओढण्यापलीकडे काही केलं नाही. यांचं ओरिजनल असं काय आहे, दुसऱ्याने जमीन तयार करायची आणि यांनी फक्त पिकं घ्यायची. 400 कोटींवरून 3 हजार कोटींवर कसा आला, 13 ते 15 लाख लिटरवर कसा आला याची यांना काहीच माहिती नाही. माजी पालकमंत्र्यांना नाॅलेज फक्त टँकर, यांना बाकी काही माहीत नाही. टँकर हा एक विषय संपला की गोकुळमधील त्यांचं नाॅलेज संपलं, बाकी यांना काहीच माहीत नाही. 


तर मी स्वत: कागलमध्ये येऊन त्यांना ओळख करून देईन


शौमिका महाडिक यांनी मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेवरून प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, "मुश्रीफ साहेब म्हणाले, कोणाच्या तरी सांगण्यावरून ऑडिट लावलं आहे. सत्ताधाऱ्यांचे संचालक असूनही चौकशी लागली याचे आश्चर्य वाटते, पण मला अधिक आश्चर्य वाटलं त्यांच्यासारख्या व्यक्तीनं असे वक्तव्य करावं. ते विसरत असतील, तर मला आठवण करू द्या, कोणाच्या सांगण्यावरून चौकशी लागलेली नाही. मला ओळखत नसतील, तर मी स्वत: कागलमध्ये येऊन त्यांना ओळख करून देईन. मी गोकुळची संचालिका आहे, मी केलेल्या तक्रारीनंतर चौकशी लागली आहे. सत्ताधारी आहेत म्हणून चौकशी लावायची नाही हा नियम मी पहिल्यांदाच ऐकला". 


मुश्रीफ साहेब यांनी स्वत: गोकुळचे ऑडिट लावलं होतं. त्यावेळी सत्ताधारी दोन आमदारांचीच सत्ता होती. गोकुळवर याची आठवण करून द्यायची आहे. ते डिस्टर्ब आहेत म्हणून अशी वक्तव्ये करत असतील, ही वक्तव्ये करण्याआधी त्यांनी विचार केला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या