Kolhapur Crime : तू माझ्या बायकोकडे का बघतोस? माझ्या घरातील खासगी माहिती तुला कशी मिळते अशी विचारणा करत मित्रानेच मित्रावर चाकूहल्ला केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात घडली. या घटनेत रावसाहेब नाभिराज मगदूम (वय 60 रा. जवाहरनगर, इचलकरंजी) गंभीर जखमी झाला. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणात प्रकाश मधुकर कोथमिरे (वय 46 रा. जवाहरनगर, इचलकरंजी) याला अटक केली आहे. त्याला 5 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री इचलकरंजीमधील ठाकरे चौकात घडली.


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावसाहेब आणि प्रकाश मित्र आहेत. ते शुक्रवारी मित्रांसमवेत बसले असतानाच प्रकाशने रावसाहेबला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू माझ्या बायकोकडे का बघतोस? खासगी माहिती तुला कशी माहीत होते, अशी विचारणा करत रावसाहेबच्या मान, खांद्यावर चाकूने वार केले. यामुळे रावसाहेब गंभीर जखमी झाला. त्यामुळे उपचारासाठी कोल्हापूरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


भरदिवसा घरात घुसून चुलतीवर बलात्कार; 30 वर्षीय नराधम पुतण्याला 10 वर्ष सक्तमजुरी


दरम्यान, चंदगड तालुक्यात शेजारीच राहणाऱ्या चुलतीच्या घरावरील खापऱ्या काढत घरात प्रवेश करून बलात्कार करणाऱ्या नराधम 30 वर्षीय पुतण्याला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात 7 फेब्रुवारी 2021 घडली होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी हा निकाल दिला. 


5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी आणि दोन वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचे आदेश दिले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नराधम पुतण्याने 7 फेब्रुवारी 2021 रोजी भरदिवसा शेजारीच राहत असलेल्या चुलतीच्या घराच्या खापऱ्या काढून घरात प्रवेश करून  चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. नराधमाने पोलिसात तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही तिला दिली. या घटनेनंतर चुलतीने चंदगड पोलिसात तक्रार दिल्यानंतर अटक करण्यात आली होती. 


या घटनेचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. सरकार पक्षाकडून 7 साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे आणि सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. तेली यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश देशमुख यांनी सख्ख्या चुलतीवरील बलात्काराच्या आरोपाखाली त्या पुतण्याला शिक्षा ठोठावली. 


इतर महत्वाच्या बातम्या