कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी काय होतं? मी परदेशात असताना 54 लोक सोडून गेले, पण आगामी निवडणुकीत लोकांनी त्यांना जागा दाखवली. पक्षाचे नाव गेलं, चिन्ह गेलं, आमदार गेले, मंत्री गेले. लोकसभा निवडणुकीत आपण 10 जागा लढवल्या त्यापैकी आपण 8 जागा जिंकल्या. काँग्रेसची एक जागा होती त्या 13 जागा झाल्या. लोकांचा प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 






कोल्हापुरात शरद पवारांनी आणखी एक मोहरा गळाला लावला


शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांनी आणखी एक मोहरा गळाला लावला आहे. लोकसभा निवडणुकीला बंडखोरी केलेले काँग्रेसचे माजी नेते बाजीराव खाडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. बाजीराव खाडे यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवर काम केलं आहे. प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये बाजीराव खाडे यांनी काम केलं आहे. 






जागावाटपाचा प्लॅन सुद्धा सांगितला


शरद पवार म्हणाले की, लोकांनी आता भाजप आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांकडून सत्ता काढून घ्यायची निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा निर्णय झालेला नाही. उद्याच्या 7 तारखेला महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी सांगितले. आम्ही तिन्ही पक्ष एकजूट आहोत. विधानसभा निवडणूक दीड महिन्यावर आली आहे. ज्या जागा आपल्याला मिळतील त्याठिकाणी उत्तम उमेदवार देऊ, असेही त्यांनी सांगितले. राज्य हे लोकांचेच येणार आहे, देशाला योग्य दिशा देण्याचं काम एकत्रित केलं जाईल याचं आश्वासन देतो, असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या