कोल्हापूर : कोल्हापुरात राजेंद्र नगर परिसरामध्ये भरगाव कारने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली रस्त्याच्या बाजूने जात असताना मैनाबाई बाळू महाराज सोनटक्के (वय 80 रा. राजेंद्र नगर झोपडपट्टी, कोल्हापूर) यांना कारने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झाल्या होत्या. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. नशेतील तरुणाने जाणीवपूर्वक अंगावर कार घालून अपघात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने सीपीआरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला जखमी झाल्यानंतर उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये आणले होते. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी काही तरुणांची नावे घेत अटक करण्याची मागणी केली. यावेळी कारमध्ये नसलेल्या तरुणांची नावे घेऊ नका, असे म्हणत काही तरुणांनी महिलेच्या नातेवाईकांशी वाद घातला. यावेळी दोन गट आमने-सामने आले होते. गुन्हा दाखल केल्यास पाहून घेऊ, अशीही धमकी देण्यात आल्याची चर्चा होती.
मैनाबाई काही घरांमध्ये स्वयंपाकांच्या काम करीत होत्या. शनिवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर गल्ली समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली होती. त्यांना गंभीर अवस्थेत कारमधील चार ते पाच जणांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. अपघाताची माहिती मिळताच महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी सीपीआरमध्ये अपघात विभागात थांबत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या तरुणांना जाब विचारला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.
इतर महत्वाच्या बातम्या