कोल्हापूर : पीएम मोदींची दहा वर्ष महायुतीची दोन वर्ष लोकांसमोर आहेत. या कामाची पोचपावती कोल्हापुरात मिळाली असून आम्ही  विजय बघून गुलाल उधळून जाणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात व्यक्त केला. एकनाथ शिंदे घुसला, बसला, करेक्ट कार्यक्रम करुन टाकला, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. संजय मंडलिकांना दिल्लीत पाठवून मोदींचे हात कोल्हापूर बळकट करणार असल्याचेही ते म्हणाले. 






एकनाथ शिंदे म्हणाले की, मी तिथे आलो की काहींच्या पोटात दुखायला लागतं. इथं येण्याची बंदी आहे का? मी आजच इथे आलो नाही तर कोल्हापूरच्या महापुरात आणि कोरोना काळात देखील इथे येऊन मदत केली. आरोग्य मंत्री म्हणून केलेल्या मदतीमुळे तसेच कोल्हापुरात उद्भवलेल्या महापुरात रोगराई पसरली नाही. राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर शहराला सढळहस्ते निधी दिला. 24 कोटी गांधी मैदान, 20 कोटी रंकाळा जीर्णोद्धार, 50 लाख शिवाजी चौकातील पुतळा सुशोभीकरण, 550 कोटी पंचगंगेचे प्रदूषण रोखणे आणि 3200 कोटी कोल्हापूरात पुन्हा पूर येऊ नये यासाठी तरतूद केल्याचे सांगितले.






त्यांनी सांगितले की, कोल्हापूरातील टोल मी बंद केला. त्यासाठी सरकारकडून 800 कोटी रुपये टोल कंपनीला दिले. मात्र आता भेटणारा खासदार निवडून देणे तुमची जबाबदारी आहे. भेटण्यासाठी तिकीट काढून टोल द्यावा लागणारा खासदार निवडू नका, असे आवाहन केले. 






इतर महत्वाच्या बातम्या