Kirit Somaiya In kolhapur : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (16 जानेवारी) कोल्हापुरात माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (kirit somaiya on hasan mushrif) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापे (hasan mushrif ed raid) टाकले आहेत, घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत? 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ साहेब यांच्या खात्यात कसे जमा झाले? अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून हे पैसे कसे काय जमा होतात, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 


सोमय्या यांनी कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, "ग्रामपंचायतने जावयाच्या कंपनीला 50 हजार रुपये देण्याचा आदेश का काढला होता? 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ साहेब यांच्या खात्यात कसे जमा झाले? हे कोल्हापूर जनतेला देखील कळलं तर बरं होईल. ग्रामपंचायतीने जावयाच्या कंपनीला 50 हजार रुपये देण्याचा आदेश का काढला होता? हे सांगावे." 


मुश्रीफ यांनी रद्द केलेल्या आदेशाचा तपास होणार


ग्रामविकास मंत्री असताना मुश्रीफ यांनी रद्द केलेल्या आदेशाचा तपास होणार असल्याचे सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. जावयाला दहेज म्हणून दरवर्षी 50 हजार रुपये देण्याचा आदेश काढला होता का? 158 कोटींचा कोलकातामधील बोगस कंपन्याकडून घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला.   


किरीट सोमय्या पुढे म्हणाले, रजत प्राव्हेट लिमिटेड, माऊंट प्रायव्हेट लिमिटेडचा मुश्रीफ साहेब यांच्या कंपन्याशी काय संबंध आहे? अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीमार्फत 49 कोटी 85 लाख रुपये कसे मिळतात? हे मुश्रीफ यांनी सांगावं. कंपनीमार्फत चेक दिला जातो, त्यानंतर मुश्रीफ यांच्यामार्फत तो चेक बँकेत जमा केला गेला. मुश्रीफ यांनी आपल्या जावायामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला 50 हजार रुपये देण्याचा जीआर काढला होता. तो जीआर रद्द केला असं सांगितले जाते, अरे पण तुम्ही त्याला ठेका दिला होता की नाही हे सांगा. यामुळे दरवर्षी राज्यातील ग्रामपंचायतीना 150 कोटींचा दणका बसणार होता.  हे कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं या सगळ्याची चौकशी होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या