कोल्हापूर: कोल्हापुरात निवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तीन कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तसाच प्रकार घडला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य करत असल्याचे सांगत देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कोणत्याही क्षणी कारवाईची धमकी देत करण्याची सांगत आणि सायबर भामट्याने शेअर्स विक्री करण्यात भाग पाडले. या प्रकरणात तब्बल आठ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. कोल्हापुरात रिलायन्स इंडस्ट्रीमधून मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या दत्तात्रय गोविंद्र पाडेकर (वय 75) या अधिकाऱ्याला शेअर्स विक्री करण्यास भाग पाडून पण सायबर भामट्यांनी तब्बल 7 कोटी 86 लाख 21 हजार 696 रुपयांना गंडा घातला आहे. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या फसवणुकीसाठी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या सुद्धा नावाचा गैरवापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फसवणुकीमध्ये तब्बल साडेसात कोटीचे शेअर्स विक्री करण्यास त्यांना भाग पाडलं आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ईडी कार्यालयातून बोलत असल्याचे संदीप रावने कुटुंबाची माहिती सांगितली. पाडेकर यांनी माझा काही संबंध नाही, कोणालाही पैसे ट्रान्सफर केले नाही असे सांगितले. ही सायबर फसवणूक असून पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी जात असल्याचे रावने फोन कट केला. काही वेळाने फोन करून अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील बोलत असल्याचे सांगितले. 

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, तक्रार झाल्यानंतर जुना राठोड पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 7 कोटी 86 लाख 21 हजार 696 रुपयाचा गंडा घातल्या प्रकरणी रक्कम पाठवलेल्या 14 बँकांसोबत पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून बँक खाती कोणाची आहेत ते पैसे कोणी काढले सीसीटीव्ही फुटेज याची माहिती मागवली जात आहे. सायबर गुन्हेगारांची ही टोळी असण्याची शक्यता आहे. दरम्यान, 14 बँकांमधील चौकशी करण्यात सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाडेकर हे गुजरात येथील जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीमधून सहाय्यक उपाध्यक्ष पदावरून सोळा वर्ष नोकरी करून निवृत्त झाले आहेत. 24 मे 2025 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला होता. फोनवरून विजयकुमार नाव असल्याचे सांगितले होते आणि तसेच डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याची माहिती दिली. 

Continues below advertisement

तुमचा डाटा लिक झाला आहे, आधार कार्डचे शेवटचे चार अंक कन्फर्म करावेत अशी माहिती सांगितली. त्यानंतर अंधेरी पूर्व येथून एक मोबाईल विकत घेतला आहे त्या मोबाईलचा वापर अनधिकृत जाहिराती फसवणूक आणि इतर लोकांना त्रास देण्यासाठी जात त्रास देण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले. तुमच्या विरोधात 20 जणांनी तक्रार केल्याचे सांगितले. तक्रारीची माहिती व्हाट्सअपवर देणार असल्याचे सांगितलं. यानंतर त्यांचा whatsapp बंद असल्याने विजयकुमार यांनी पाडेकरांची पत्नी सुरेख यांच्या मोबाईलवर नोटीस पाठवली. त्यामध्ये मुंबई पोलिसांचा लोगो, इंग्रजीत पाडेकर यांचा मोबाईल क्रमांक होता. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही लोकांचे फोटो पाठवले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या