Rajya sabha election 2022 : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील शिवसेनेच्या संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक  (Dhananjay Mahadik) यांच्यामध्ये थेट लढत आहे. दोन्हीकडून विजयाचा दावा करण्यात येत असला, तरी काय होणार याचे उत्तर आजच संध्याकाळी मिळणार आहे. दरम्यान, धनंजय महाडिक यांच्या भावजय आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी त्यांचे दीर धनंजय महाडिक राज्यसभेत नक्की जातील, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली.  


शौमिका महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, या निवडणुका पक्षीय पातळीवर असतात. त्यामुळे यामध्ये आमचे पक्षीय नेतृत्व आहे. शिवाय अमल महाडिक असतील, नानासाहेब आहेत, इतर जे माझे दीर आहेत त्यामध्ये राहुल महाडिक असतील, सम्राट महाडिक असतील यांचे सुद्धा चांगले संबंध आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यासारखी भाजपकडे आमदार आहेत, ज्यांची तब्येत बरी नसून सुद्धा आपल्या पक्षासाठी प्रामाणिकपणे मतदान करायला हजर राहिले आहेत, तर मला असं वाटतं की, या सगळ्यांचा नक्की फायदा होणार आहे. 


पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्याकडून संजय पवार यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरु आहेत, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महाडिक निवडणुकीत आहेत म्हटल्यावर ते बोलणारच हे ओघानं आले, पण त्यांच्या पक्षाची मते पाहता ते एक खासदार निवडून देऊ शकतात, आणि उरलेली दोन मते पाहता त्यांना फारसे गांर्भियाने घ्यावसं वाटतं नाही असा टोला त्यांनी लगावला.  


भाजपच्या बाजूने निकाल लागल्यास महाविकास आघाडीला चिंतन करावं लागेल 


राज्यसभेचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास महाविकास आघाडी चिंतेची बाब असेल असे त्यांनी सांगितले. त्यांनी खरं तर विचार केला पाहिजे. ही निवडणूक इतर अपक्ष आमदारांवरही अवलंबून आहे, कारण पक्षाचे आमदार दाखवून मते देतील, पण अपक्ष आमदारांना तसं बंधन नाही. शिवाय छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या आमदारांचे यामध्ये खूप मोठा आहे. या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास महाविकास आघाडीने विचार केला पाहिजे. आपण आधी या लोकांना कशी ट्रीटमेंट दिली आहे आणि पुढे कशी दिली पाहिजे आणि कसं सामावून घेतलं पाहिजे, याबाबत त्यांना खूप मोठं चिंतन करावे लागेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या