कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी (Dhananjay Mahadik on Shahu Maharaj) पराभवाची कुंडलीच मांडली. पक्षांतर्गत कुरघोड्यांसह कोणत्या कारणांमुळे पराभवाचा फटका बसला, याबाबत त्यांनी भाष्य केले. महायुतीला कोल्हापुरात फटका बसल्यानंतर बैठक पार पडली. या बैठकीत संजय मंडलिक यांच्या पराभवाचे आकलन करण्यासह महायुतीच्या माध्यमातून कसं काम केले पाहिजे याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी सुद्धा चर्चा करण्यात आल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.
धनंजय महाडिक यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या निकालाचे चित्र संपूर्ण देशभरामध्ये असून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी समीकरणे होती. समस्या वेगळ्या होत्या. घटक पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुद्धा होत्या. राज्यात महायुतीला फटका बसल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. महाराष्ट्रात मराठा आंदोलन, शेतमालाचा दराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग पराभवाची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
शाहू महाराजांबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांना आदर
ते पुढे म्हणाले की सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरात शाहू महाराज उमेदवार असल्याने महायुतीला फटका बससा. शाहू महाराजांबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांना आदर आहे, याचाच फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यामुळे आम्हाला संजय मंडलिकेचा पराभव मान्य असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले. दरम्यान भविष्यात चिंतन करून कोल्हापूर जिल्ह्यात महायुती कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर आरोप केला. ते म्हणाले की काँग्रेसने देशावर 68 वर्ष राज्य केले. काँग्रेसने नॅरेटिव्ह सेट करण्यात चॅम्पियन आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने महागाई आणि संविधान बदलणार हे मोठ्या प्रमाणात वापरल्याचा परिणाम मतदारांवर झाला. निवडणूक नेहमी जनतेच्या हातामध्ये असते. कारण देशभरात जवळपास 19 मंत्र्यांचा पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या