Devendra Fadnavis In Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रासाठी साखरेच्या बाबतीत देखील मोठी बातमी लवकरच अमित शहा देणार आहेत. इतकी वर्ष पश्चिम महाराष्ट्रात पवार साहेबांनी राज्य केलं. मात्र, त्यांच्या काळात जे होऊ शकलं नाही तेवढं सिंचनाचं काम आम्ही केलं आहे.  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी जाती धर्माचा आधार घेतला गेला, पण जे झालं नाही त्याचा फारसा विचार करू नका, आता आरे ला कारे केल्याशिवाय आपण फेक नरेटिव्हला उत्तर देऊ शकत नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 


तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो


कोल्हापुरातील कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली. मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपत प्रवेश केला. आवाडे पिता पुत्रांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत असताना महामंत्री सुरेश हळवणकर यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल मी हळवणकर यांचे विशेष अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, आज पश्चिम महाराष्ट्रात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. आपण जर ठरवलं तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो. आपण आत्मविश्वासाने उभे राहिलो तर कोल्हापुरातील या आधीचे सर्व रेकॉर्ड आपण मोडू शकतो. पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा गड आहे हे आपण दाखवून देऊ शकतो. 


महाराष्ट्रात 175 जागा आणायच्या असतील तर दोन कोटी 75 लाख मत लागतात.


ते पुडे म्हणाले की, विशिष्ठ समाजाने एकत्र येऊन आपल्या विरोधात मतदान केलं आहे. महाराष्ट्रात 175 जागा आणायच्या असतील तर दोन कोटी 75 लाख मते लागतात. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे मिळत आहेत. लोकांचं जीवन बदलण्याचं काम आपण करत आहोत. भारतात जात धर्म प्रांत यापलीकडे जाऊन प्रामाणिकपणे मतदार करणारा वर्ग म्हणजे महिला आहे.ज्या ठिकाणी महिला केंद्रित काम झालं आहे. त्या त्या ठिकाणी पुन्हा सत्ता आली हा या आधीचा अनुभव आहे. आपल्या लाडक्या बहिणीच पुन्हा आपल्याला सत्तेत आणणार आहेत.  आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आत्मविश्वासाने पुढे जावं लागेल. शंभर काम असतील तर त्यातील 50 कामच पूर्ण होतात यात 50 कामांचा दिंडोरा आपल्याला पिटता आला पाहिजे. 


लोकसभेपेक्षा आता परिस्थिती बदलली आहे


त्यांनी सांगितले की, अमित शाह यांनीच 2014 ला भारतीय जनता पक्षाची ताकद ओळखली आणि सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळेच राज्यात  भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला.  लोकसभेत निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही हे सत्य आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी मी सांगितलं होतं फेक नरेटिव्ह फार काळ चालत नाही. मात्र, आता तुम्ही लोकांमध्ये जाल तर लक्षात येईल की लोकसभेपेक्षा आता परिस्थिती बदलली आहे. फेक नरेटीव्ह सेट करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. खोटं बोलून आपली मतं पळवली गेली. मात्र, आता दलित मातंग आदिवासी अशी सर्वच समाज आपल्या पाठीशी उभे आहेत.सोयाबीन कापूस कांदा ऊस बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पसरवली गेली, असा आरोप त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या