MLA Prakash Awade Joins BJP : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी मुलगा राहुल आवाडे यांच्यासह भाजपमध्ये (MLA Prakash Awade Joins BJP) प्रवेश केला आहे. आज (25 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये आवाडे पिता पुत्राचा भाजप प्रवेश झाल्याने गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे महायुतीची किमान चार मतदारसंघांमधील डोकेदुखी कमी झाली आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

Continues below advertisement






आमदार प्रकाश आवाडे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या ठिकाणी त्यांनी राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्याच बरोबर त्यांनी हातकलंगलेमधून जयश्री कुरणे यांना उमेदवारी जाहीर केली होतीय. त्यांनी ही उमेदवारी त्यांच्या ताराराणी पक्षाकडून जाहीर केली होती. उमेदवारी मागण्यासाठी कोणाकडे जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे दोन मतदारसंघांमध्ये महायुतीची अडचण झाली होती. मात्र, आता प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राहुल आवाडे यांची भाजपकडून इचलकरंजीमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 






अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यापूर्वी मुंबईमध्ये प्रकाश आवाडे यांनी भेटीघाटी घेत चर्चा केली होती. या भेटीगाठीमध्ये त्यांनी मुलासाठी उमेदवारीचा शब्द घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष होते. मात्र, आवाडे पिता-पुत्रांना सोबत घेत हाळवणकर व्यासपीठावर पोहोचले. त्यामुळे दोघांमधील राजकीय वाद संपण्यामध्ये आता पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेतला आहे का? अशी सुद्धा चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या