Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाईट वाटत नसेल, ते उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटत नसेल. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच म्हटले होते की, मुख्यमंत्रीपदासाठी मला शरद पवारांनी जबरदस्ती केली. एकत्र येण्यासाठी आमच्याकडून जितका होईल तितका प्रयत्न केला होता. 


अयोध्येत महाराष्ट्र भवनची इच्छा 


दीपक केसरकर यांनी सांगितले की, अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बनवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. अयोध्या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना म्हणाले की, रामाचा आशीर्वाद लाखमोलाचा असतो. महाराष्ट्रात रामराज्य घडवण्यासाठी श्रीरामाचे आशीर्वाद लागणारच. म्हणून प्रभुरामाच्या आशीर्वादासाठी आम्ही जात आहोत. 


शिंदे गटाला मार्केटिंग करण्याची गरज नाही 


दुसरीकडे, दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर चांगलीच तोफ डागली. आम्ही लोकांची कामे करत असल्याने आम्हाला मार्केटिंगची गरज नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आम्ही लोकांची कामे करतो. मी कोल्हापूरचा पालकमंत्री असल्याने परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मार्केटिंगची गरज आदित्य ठाकरे यांना आहे. त्यांनी अडीच वर्ष मंत्री राहून त्यांनी काही केलं नाही. मुंबईतील सर्वाधिक प्रदुषित झालेली हवा ही आदित्य यांची देणगी आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आदित्य ठाकरेंना मार्केटिंगची गरज आहे. त्यांना मोठमोठे सल्लागार असतात. लोकांची बदनामी कशी करायची याच उत्कृष्ठ ट्रेनिंग आदित्य यांना दिलेलं आहे. ते ट्रेनिंग त्यांना लखलाभ होऊ दे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Rajaram Sakhar Karkhana : अवैध उमेदवारावरून दोन्ही गटाची सुनावणी पूर्ण; सोमवारच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष