हुपरी: हुपरीमध्ये घराची वाटणी करण्याच्या कारणावरून माथेफिरू मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडीलांना निर्घृणपणे (Crime News) संपवल्याची घटना घडली आहे. बांबूच्या दांडक्याने डोक्यावर वार करून, विळ्याच्या पात्याने मान आणि काचेच्या तुकड्याने हाताच्या नसा कापून जन्मदात्या (Crime News) आई-वडिलांचा त्याने खून केला. नारायण गणपतराव भोसले (वय ८२), विजयमाला नारायण भोसले (७०) अशी मृत वयोवृद्ध दाम्पत्यांची (Crime News) नावे आहेत. या प्रकरणी आरोपी सुनील नारायण भोसले (४८, रा. हुपरी, ता. हातकणंगले) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, हुपरीत भोसले यांचा दीड गुंठ्यांचा प्लॉट आहे, त्यातील अर्धा गुंठा वाटणीसाठी आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.(Crime News)

Continues below advertisement

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हुपरीतील महावीरनगरमध्ये नारायण भोसले व त्यांच्या पत्नी विजयमाला हे दोघेही राहत होते. त्यांची मुले चंद्रकांत आणि संजय ही व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात, तर सुनील हा घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहतो. चंद्रकांत व संजय हे दोघेही आई-वडिलांना भेटायला अधून-मधून गावी येत असत. सुनील हा कायमच किरकोळ कारणावरून भांडण काढून आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करत होता. महिन्यापूर्वीच त्याने काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दोघांना दिली होती. मात्र, माफी मागितल्याने त्याच्याविरुद्ध त्यांनी तक्रार दिली नव्हती अशी माहिती समोर आली आहे.(Crime News)

Crime News: अंथरुणात बांगड्याचा खच

मी आई-वडिलांचा खून केल्याची माहिती सुनीलने पोलिसांना सांगत तो ठाण्यात हजर झाला. वडिलांच्या डोक्यावर लाकडाने प्रहार करताना शोकेस कपाटाची काच फुटली. त्याच काचेने त्याने आई-वडिलांच्या हाताच्या नसा कापल्या. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आईच्या अंथरुणात तिचं तुटलेले मंगळसूत्र आणि फुटलेल्या बांगड्यांचा खच पडला होता.

Continues below advertisement

Crime News: शेजाऱ्यांनाही दिली मारण्याची धमकी

आई-वडिलांचा खून केल्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीलने बांबूचे दांडके, विळ्याचे पाते बाथरूममध्ये धुतलं, त्यानंतर त्याला आपल्या शेडजवळील दरवाजाच्या भिंतीजवळ नेऊन ठेवले. त्यानंतर, गेट बंद करून घराबाहेर निर्विकारपणे बसला होता. कुणी घराजवळ आल्यास त्यांना दगड फेकून मारण्याची धमकी तो देत होता. त्यामुळे घराजवळ जायला कुणी धाडस करत नव्हते.

Crime News: चुलत वहिनीलाही फरशी फेकून मारली

पहाटे पावणेसहाच्या सुमारास घरात आरडाओरडा ऐकू येऊ लागला. आजुबाजुचे शेजारी राहणाऱ्या चुलत वहिनी राजमाता यांनी घरात भांडण सुरू असल्याचे संजय यांना फोनवरून कळवले. त्यानंतर, नेमके काय घडले, हे बघायला गेलेल्या राजमाता यांनाही सुनीलने फरशीचा तुकडा फेकून मारला.