CM Eknath Shinde In Kolhapur: पोपटाचा जीव कशात असतो म्हणतात त्या पद्धतीने तुमचा जीव मुंबई महापालिकेत आहे. खरा युती धर्म पाळण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हा खराखुरा निष्कलंक माणूस आहे, 2019 साली कलंकितपणा तुम्ही केला, बाळासाहेबांच्या नावाला कलंक तुम्ही लावला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने निर्माण झालेल्या चिंतेवरून दिलासा देण्याचा प्रय़त्न केला. तसेच ही युती वैचारिक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी सांगितलं मुंबई महानगरपालिका शिवसेनेला देऊन टाका
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी सांगितलं मुंबई महानगरपालिका शिवसेनेला देऊन टाका. मात्र, देवेंद्र फडणवीस कोठेही बोलले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं आणि त्यावेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाला असता म्हणून पद घेणे टाळलं, हे सर्व माझ्यावर ओढवलेले प्रसंग आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. युती टिकावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दरवेळी दोन पावलं मागे घेतली 2019 साली मी देखील आमच्या नेत्यांना सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांचे फोन घ्या, एकत्र बसून निर्णय घेता येईल.
शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही
जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. बेरजेच्या राजकारणासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मी शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, आपली झालेली वैचारिक, भावनिक युती आहे, स्वार्थाची नाही. 2019 मध्ये बाळासाहेबांना विचारांना तिलांजली दिली आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. निधीचाही विषय होता. मग आम्ही निर्णय घेतला. आपलं सरकार मजबुतीने काम करत आहे. पूर्वीपेक्षा वेगळी स्थिती आहे, शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कोणताही अन्याय होणार नाही, एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राजकारणात बेरजेची समीकरणे असतात, अजितदादांनी विकासाची भावना ठेवून आले. देवेंद्र यांनी सांगितलं आमची युती इमोशनल आहे. आपल्या सरकारला केंद्राचं पाठबळ आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. आणखी दीड वर्षात काय होईल ही भीती अस्लयाने विरोधक मोट बांधण्यांचा प्रयत्न केला, पण त्यांची बोट तुटली. सलग दोनवेळा देशात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं, पण विरोधक एकत्र येऊनही ते एकाचे नाव ठरवू शकत नाही, नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या