CM Eknath Shinde In Kolhapur: जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. बेरजेच्या राजकारणासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मी शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वास शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, आपली झालेली वैचारिक, भावनिक युती आहे, स्वार्थाची नाही. 2019 मध्ये बाळासाहेबांना विचारांना तिलांजली दिली आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. निधीचाही विषय होता. मग आम्ही निर्णय घेतला. आपलं  सरकार मजबुतीने काम करत आहे. पूर्वीपेक्षा वेगळी स्थिती आहे, शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कोणताही अन्याय होणार नाही, एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा आहे  असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


विरोधी पक्षांकडे बोलायला शिल्लक नाही 


गेल्या अडीच वर्षातील बंद कामाला चालना दिली, सर्वांसाठी सर्व घटकांसाठी निर्णय घेतले. विरोधी पक्षांकडे बोलायला शिल्लक नाही. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांना टीका करता आली नाही. पंचामृतमध्ये लोटा भरून प्यायचं नसतं, थोडं थोडं घ्यायचं नसतं. सरकार कोसळेल, 16 आमदार अपात्र होतील असे बोलण्यात आले. मात्र, 220 आमदारांचे पाठबळ एकनाथ शिंदेच्या पाठिशी आहे. राजकारणात बेरजेची समीकरणे असतात, अजितदादांनी विकासाची भावना ठेवून आले. देवेंद्र यांनी सांगितलं आमची  युती इमोशनल आहे. आपल्या सरकारला केंद्राचं पाठबळ आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. आणखी दीड वर्षात काय  होईल ही भीती अस्लयाने विरोधक मोट बांधण्यांचा प्रयत्न केला, पण त्यांची बोट तुटली. 


मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, देशात तुमच्या खासदाराचा पाचवा नंबर आला त्याचे स्वागत करतो. बाळासाहेबांवर कोल्हापूरने भरभरून प्रेम दिलं हा इतिहास आहे. बाळासाहेब अंबाबाईचे दर्शन घेऊन सुरुवात करायचे.  सभांना प्रतिसाद आपण द्यायचा असं कोल्हापूर आणि शिवसेना नातं आहे. हे नात अभेद्य ठेवण्याचं काम पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. ते म्हणाले की, हिंदुत्वाची भूमिका सरकार स्थापन केलं. सर्वसामान्यांचं सरकार स्थापन केलं. वर्षभर घेतलेलं निर्णय आपल्यासमोर आहेत. सामान्यांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सरकार स्थापन केलं. सगळे निर्णय लोकहिताचे निर्णय घेतले. वैयक्तिक लाभाचा निर्णय घेतला नाही.  सरकार स्थापन करण्यापूर्वीची स्थिती आपणास माहीत आहे. योजना, प्रकल्प बंद पाडले होते. आम्ही बंद प्रकल्प सुरु केले.