Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार राजर्षी शाहू (Rajarshi Shahu Maharaj) सलोखा मंचच्या बैठकीत करण्यात आला. दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात ही बैठक पार पडली. अमृतमहोत्सवी वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी विविध मान्यवरांनी बैठकीत सूचना केल्या. कोल्हापुरातील (Kolhapur News) सर्व जाती-धर्मातील एकोपा टिकून राहण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा रॅलीचे (Rajarshi Shahu Reconciliation Rally) आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक म्हणाले की, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पुरोगामी विचार जोपासणारे आहेत. कोल्हापूरच्या जनतेशी ते एकरूप झाले आहेत. कोल्हापुरातील सर्व जाती-धर्मातील एकोपा टिकून राहावा, ही त्यांची भूमिका आहे. त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करणे, महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातून दुचाकी व चारचाकी फेरी काढण्यात येईल.’’
आदिल फरास यांनी सांगितले की, राजर्षी शाहू महाराज यांनी एकोप्याचा संदेश दिला. त्याच विचारावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज वाटचाल करत आहेत. केएसएच्या माध्यमातून त्यांनी फुटबॉलला दिशा दिली. सी. एम. गायकवाड यांनी शहरातील शाळांनी फेरी काढून महाराजांना शुभेच्छा द्याव्यात, असे सांगितले. डी. जी. भास्कर यांनी व्याख्यान, तर गणी आजरेकर यांनी मुस्लिम बोर्डिंगतर्फे फळे वाटप, निबंध स्पर्धा उपक्रम घेण्यात येतील, असे स्पष्ट केले.
Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : निकाली कुस्त्यांचे आयोजन
दरम्यान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. 7 जानेवारी रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रंगणार आहे. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित असतील.
प्रथम क्रमांकाची कुस्ती विजयी शाहू गंगावेस तालमीचा पैलवान महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान हिंदकेसरी भारत केसरी गौरव मच्छीवाला यांच्यात होईल. गंगावेस तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब गुरुभवानी आखाड्याचा मल्ल सतनाम सिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल. सिकंदर शेखने पंजाब,उत्तर प्रदेश, हरियाणामधील नामवंत मल्लांना अस्मान दाखवून पंजाबमध्ये सर्वाधिक कुस्त्या जिंकलेला मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला आहे. गौरव मच्छीवाला हा हिंदकेसरी असून त्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या