kolhapur district gram panchayat election : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील 66 ग्रामपंचायत निवडणुकांच्या उपसरपंचपदाच्या (Radhanagari Taluka) निवडी एकाच दिवशी 12 जानेवारीला घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले आहेत. उपसरपंचाची निवड लोकनियुक्त सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राधानगरी 58 पैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
गेल्या महिन्यात राधानगरी तालुक्यात एकाच वेळी 66 ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया होऊन 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली होती. या निवडी लोकनियुक्त सरपंचांच्याअध्यक्षतेखाली होतील. जर काही अपरिहार्य कारणास्तव लोकनियुक्त सरपंच बैठकीस अनुपस्थित राहिले तर त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना दिले आहेत. तर पहिल्या सभेची नोटीस काढून ती नवनिर्वाचित सदस्यांना लागू करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित गावच्या ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आता उपसरपंच पदाच्या निवडीची तारीख जाहीर झाल्याने उपसरपंच निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत विशेषतः काठावरचे बहुमत असलेल्या आघाडीचे सदस्य सहलीवर जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींचा निकाल स्पष्ट झाला असून महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली असून तब्बल 198 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. महाविकास आघाडीने गावगाड्यावर सरशी केली असली, तरी भाजप आणि शिंदे गटानेही दमदार प्रवेश केला आहे.
निकालामध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारत वर्चस्व राखले आहे. भाजप- शिंदे गटानेही जोरदार मुसुंडी मारली आहे. जिल्ह्यात 474 पैकी 45 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे 429 गावांसाठी निवडणूक पार पडली. दरम्यान, महाविकास आघाडीचे वर्चस्व सर्वच तालुक्यात दिसून आले. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवून सत्ता मिळवलेल्यांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच आहेत. यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), जनसुराज्य, शेकाप सरपंचांचाही समावेश आहे. (Kolhapur District Gram Panchayat Election Result)
कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षीय बलाबल
- काँग्रेस 54
- राष्ट्रवादी 17
- शिवसेना ठाकरे गट 28
- भाजप 14
- शिंदे गट 6
- राष्ट्रवादी आणि काँग्रेस (एकत्र) 10
- स्थानिक आघाडी 19
- सर्वपक्षीय आघाडी 92
- वैयक्तिक गट 12
इतर महत्वाच्या बातम्या