कोल्हापूर : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराज (Govinda Dev Giri) यांनी व्यासपीठावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली. त्यानंतर त्यांनी वक्तव्य मागे घेण्याची मागणी होऊ लागली आहे. गोविंद देव गिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
संभाजी राजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोविंद गिरी महाराज काय म्हणालेत हे मी ऐकलं नाही. त्यामुळं यावर ठोस बोलणं उचित होणार नाही, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यासोबत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते चर्चा करत आहेत. लोकसभेसाठी माझं पाहिले प्रेम कोल्हापूरच आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्या : संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व्हेक्षण करावे लागणार ही मागणी मी करत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केलं हे आनंदाचे आहे. आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यायला पाहिजे. मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व्हेक्षण करावे लागणार ही मागणी मी करत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केलं हे आनंदाचे आहे. आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यायला पाहिजे.
मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली पाहिजे : संभाजीराजे
कुणालाही खुश करण्यासाठी शॉर्टकट वापरू नका, नाहीतर पुन्हा कोर्टात हे टिकणार नाही. आठ दिवसात करतो, 10 दिवसात करतो यापेक्षा परिपूर्ण सर्व्हेक्षण व्हावं. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आरक्षणासाठी लढत आहेत. कुणबी प्रमाणपत्र सर्वांनाच मिळणार नाही, त्यामुळे मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल : संभाजीराजे
मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करत आहे. सरकार तातडीने घोषित का करत नाही की आम्हाला कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल. क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी होईल आणि मराठा समाजाची बाजू ऐकून घेतली जाईल, असे देखील संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको : संभाजीराजे
छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हे मुख्यमंत्र्यांनी धाडस केलंपण आरक्षण कसं देणार हे सांगावं. देवेंद्र फडणवीस असताना आरक्षण टिकलं नाही. निवडणुका समोर आहेत म्हणून कसही सर्व्हेक्षण करू नका आठ दिवसांपेक्षा चार महिने घ्या पण मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको, असे देखील संभाजीराजे म्हणाले.
हे ही वाचा :