Kolhapur News : राज्यसह संपूर्ण देशांमध्ये आजपासून बाप्पांचे आगमन होत आहे. दोन वर्षानी अपूर्व उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असले, तरी कोल्हापूर शहरात गणेश आगमन मिरवणूकही आकर्षणाचा विषय असतो. मंडळांकडून नेण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती तसेच घरगूती गणेश मुर्ती आणण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेत कोल्हापूर शहरात पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. 


वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रामुख्याने शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, गंगावेश, बापट कॅम्प आदी ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.


प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग 



  • शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहने व मूर्ती नेण्यासाठी येणारी वाहने वगळण्यात आली आहेत 

  • फोर्ड काॅर्नर, उमा टाॅकिज चौक दिशेने कुंभार गल्लीत येणारी वाहने 

  • पार्वती सिग्नल चौक, उमा टाॅकिज चौकातून कुंभार गल्लीत येणारी वाहने

  • गवत मंडई चौकातून  कुंभार गल्लीकडे येणाऱ्या वाहनांना मंडई चौकापासून प्रवेशबंदी आहे. 


पापाची तिकटी, गंगावेश 



  • पापाची तिकटी ते बुरूड गल्ली मार्ग वाहनांसाठी बंद आहे

  • शाहू उद्यान, गंगावेश ते कुंभार गल्ली जाणाऱ्या वाहनांना उद्यानापासून पुढे सोडण्यात येणार नाही 

  • गंगावेश चौक, पापाची तिकटी,  माळकर चौक या मार्गावर वाहने पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे


बापट कॅम्प कुंभार गल्ली



  • शिरोली टोल नोका ते बापट कॅम्पकडे जाणारी सर्व वाहने शिरोली नाका येथून पुढे सोडण्यात येणार नाही


पार्किंग सुविधा



  • आयर्विन ख्रिचन हायस्कूल मैदान 

  •  शाहूपुरी चौथी व पाचवी गल्ली वाहतूकीस अडथळा न करता 

  •  जाधववाडी शाळा क्रमांक 32 


इतर महत्त्वाच्या बातम्या