Bidri Sakhar Karkhana Result : अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यांमध्ये सत्ताधारी गटच पुन्हा एकदा बाजी मारण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत (दुपारी दोनपर्यंत) झालेल्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी आघाडीचे सर्वच उमेदवार तीन ते साडेतीन हजार मतांनी आघाडीवर असल्याने विरोधकांनी तगडी फाईट देऊन सुद्धा फारसा परिणाम शेतकऱ्यांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे. 


वाचा : Bidri Sakhar Karkhana : बिद्री कारखान्यासाठी मतमोजणी सुरु; कोण लई भारी अन् कोणाचा कंडका पडणार? 


त्यामुळे पुन्हा एकदा बिद्री साखर कारखान्याचा धुरा माजी आमदार के.पी. पाटील यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक अत्यंत चर्चेची अन् अत्यंत चुरशीची अशी झाली आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आघाडीकडून हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बळ लावलं होतं, तर विरोधी आघाडीकडून खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक आमदार प्रकाश आंबिटकर, समरजितसिंह घाटगे यांनी बळ लावले होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सत्तांतर होणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, पुन्हा एकदा निकालामध्ये कारखान्याच्या सभासदांनी के. पी. पाटील यांच्या कारभारावर विश्वास व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. 


वाचा : Bidri Sakhar Karkhana Nikal LIVE : के पी सायबा तुम्हाला देवही माफ करणार नाही, रोजंदारांच्या जीवाशी खेळला; बिद्री कारखान्याच्या मतपेटीतून चिठ्ठ्यांचा पाऊस


दुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सरासरी साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विजय दिसू लागल्याने सभासदांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. ए. वाय. पाटील या निवडणुकीमध्ये चमत्कार करणार का? अशीही चर्चा रंगली होती. मात्र, त्यांचा सुद्धा फारसा परिणाम झालेला दिसून आलेला नाही. ए वाय पाटील स्वतः उत्पादक सभासद गटामधून पिछाडीवर आहेत. त्यामुळे हा विरोधकांसाठी एक प्रकारे धक्का मानला जात आहे. कल कायम राहिल्याने विरोधी आघाडीचा महत्त्वाचा चेहरा असलेल्या ए. वाय. पाटील यांनी मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला. त्यामुळे याची चर्चा सोशल मीडियामध्ये सुद्धा रंगली आहे.  मतदारांनी मतदान करताना चिट्ठ्यांमधूनही आपला राग व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीने सत्ताधारी के पी पाटील यांना कानपिचक्या दिल्या आहेत, त्याच पद्धतीने ए. वाय. पाटील यांना सुद्धा दिल्या आहेत. त्यामुळे सभासदांना या दोघांमध्ये झालेली फाटाफूट आवडलेली नाही, असंच यामधून सूचित होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या