Bidri Sakhar Karkhana : बिद्री कारखान्यासाठी मतमोजणी सुरु; कोण लई भारी अन् कोणाचा कंडका पडणार? 

Bidri Sakhar Karkhana : कोल्हापुरातील मुस्कान लॉन परिसरात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत असून या परिसराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

विजय केसरकर, एबीपी माझा Last Updated: 05 Dec 2023 04:02 PM
Bidri Sakhar Karkhana Nikal LIVE : बिद्री कारखान्याची मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण; दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु

  • बिद्री कारखान्याची मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण

  • दुसऱ्या फेरीची मतमोजणी आता सुरू

  • मतपत्रिका एकत्रीकरण सुरू

  • या फेरीमध्ये अंदाजे 15 हजार मते मोजणार



Bidri Sakhar Karkhana Nikal : सरासरी सतारूढ आघाडीचे सर्वच उमेदवार 4500 ते 4700 च्या फरकाने आघाडीवर

Bidri Sakhar Karkhana Nikal : बिद्री साखर कारखान्याच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात झाली आहे. 120 टेबलावरील मतमोजणी सुरू आहे. गट 1 ते 4 ची मतमोजणी पूर्ण झाली आहे, तर काही टेबलवर मतदान कमी असतील तिथे सर्वच उमेदवारांची मते मोजली आहेत. सद्या राधानगरी,कागल,भुदरगड मधील काही गावे यांची मतमोजणी सुरू आहे. सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार 34500 ते 4700 च्या फरकाने आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीत भुदरगडमधील काही गावे व करवीरची सर्व गावे मोजली जाणार आहेत. याठिकाणी सत्ताधारी आघाडीस आघाडी मिळण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांचा विजय आवाक्यात आला आहे. 



  • गट क्रमांक 6 भुदरगड व करवीरची गट क्रमांक 7 मते अद्याप मोजावयाची आहेत 

  • सरासरी सतारूढ आघाडीचे सर्वच उमेदवार 4500 ते 4700 च्या फरकाने आघाडीवर 

Bidri Sugar Factory Result : बिद्रीत पुन्हा एकदा केपीच लई भारी ठरण्याची चिन्हे; सत्ताधाऱ्यांचं 'विमानट सुसाट!

बिद्री साखर कारखाना निकाल (दुपारी एकपर्यंत) 


Bidri Sugar Factory Result : बिद्री साखर कारखान्यामध्ये पुन्हा एकदा केपीच लय भारी ठरण्याची चिन्हे असून सत्ताधाऱ्यांनी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. आहे. सत्ताधारी आघाडीमधील उमेदवार तीन ते साडे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

Bidri Sakhar Karkhana Nikal : भुदरगड, राधानगरी कागलमध्ये सत्तारूढ आघाडीला मोठी आघाडी

  • भुदरगड, राधानगरी आणि कागल मध्ये सत्तारूढ आघाडीला मोठी आघाडी

  • सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनलचे आगेकूच कायम

  • सत्ताधारी आघाडीच्या सर्वच उमेदवार 600 ते 1000 च्या मतांनी आघाडीवर

  • पहिल्या टप्प्यात अपेक्षित यश मिळतात सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष

Bidri Sakhar Karkhana Result : "एवाय साहेब राजकारणात कोणी संपत नाही, पण तुम्हाला गाव सोडायला लावणार हे मात्र नक्की"

अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री साखर कारखान्याची (Bidri Sakhar Karkhana Result) मतमोजणी सुरु असून सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी गटालाच मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येत आहे. कारखान्यासाठी सभासदांनी मतदान करतानाच सत्ताधारी आणि विरोधकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.


के. पी. पाटलांना उद्देशून काय म्हटलं आहे चिट्टीत?


के. पी. सायबा, तुम्ही हजारो रोजंदारीच्या जीवाशी खेळलात, त्यांचे करिअर उद्ध्वस्त केले. याला देवही माफ करणार नाही. 


पोरांना दिवाळीला 1 साबण जरी दिला असता, तर त्यांनी तुमचे आभार मानले असते 



तुमचा संपूर्ण कारखाना टेंपररी सांभाळला आणि तुम्ही त्यांच्या तोंडाला पाने पुसता. पर्मनंटना 28 चा 30 टक्के बोनस करतात. परंतु, टेंपररी सिव्हिलच्या पोरांना दिवाळीला 1 साबण जरी दिला असता, तर त्यांनी तुमचे आभार मानले असते. 



ए. वाय. पाटील यांना उद्देशून काय म्हटलं आहे?


एवाय साहेब राजकारणात कोणी संपत नाही, पण तुम्हाला गाव सोडायला लावणार हे मात्र नक्की - सभासद सोळांकूर  

Bidri Sugar Factory Result : बिद्री कारखान्यात भुदरगड, राधानगरी आणि कागल मध्ये सत्तारूढ आघाडीला मोठी आघाडी

Bidri Sugar Factory Result : बिद्री कारखान्यात भुदरगड, राधानगरी आणि कागल मध्ये सत्तारूढ आघाडीला मोठी आघाडी मिळाली आहे. तब्बल 6324 मतांची आघाडी मिळाली आहे. 

Bidri Sakhar Karkhana Nikal : सुरवातीच्या कलांमध्ये बिद्रीत विमानाची आघाडी; कपबशीची सुद्धा जोरात

Bidri Sakhar Karkhana Nikal : सुरवातीच्या कलांमध्ये बिद्रीत विमानाची आघाडी; कपबशीची सुद्धा जोरात 


9 चे 11.30 पर्यंत थेट निकाल अपडेट


उत्पादक सभासद गट क्र. 1(राधानगरी)


1. विठ्ठलराव खोराटे.(कपबशी)...2303
2. ए.वाय.पाटील. (कपबशी)...2391
3. राजेंद्र पाटील. (विमान)...3816
4. रामचंद्र पाटील. (टेबल)...29
5.राजेंद्र भाटळे. (विमान)...3615
6.राजेंद्र मोरे.. (विमान)...3789
7.नंदकुमार सुर्यवंशी. (कपबशी)...2262

Bidri Sakhar Karkhana : "केपी सायबा सिव्हीलच्या पोरांना दिवाळीला 1 साबण दिला असता तरी आभार मानले असते"

Bidri Sakhar Karkhana : बिद्री कारखान्यासाठी मतमोजणी सुरु झाली आहे. मतपेटीतून मतदारांनी सत्ताधारी गटाचे नेते के.पी. पाटील यांना कानपिचक्या दिला आहेत. 


के, पी. सायबा, 



तुमचा संपूर्ण कारखाना टेंपररी सांभाळला आणि तुम्ही त्यांच्या तोंडाला पाने पुसता. पर्मनंटना 28 चा 30 टक्के बोनस करतात. परंतु, टेंपररी सिव्हिलच्या पोरांना दिवाळीला 1 साबण जरी दिला असता, तर त्यांनी तुमचे आभार मानले असते. 



Bidri Sakhar Karkhana Nikal LIVE : बिद्री साखर कारखान्याची मतमोजणीची प्रक्रिया सुरु

Bidri Sakhar Karkhana Nikal LIVE : बिद्री साखर कारखान्याची मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मतमोजणी केंद्रात मतपेट्या आणल्या आहेत. मतपत्रिका एकत्र करण्यासाठी सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष मजमोजणीसाठी साधार तास लागण्याची शक्यता आहे. 

बिद्री कारखान्यासाठी मतपत्रिका एकत्रीकरण सुरू सुरु

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोल्हापुरातील मुस्कान लॉन परिसरात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत आहे. या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या निवडणुकीत एकूण 56 हजार 91 पैकी 49 हजार 940 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता 173 मतदान केंद्रावर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. दोन्ही आघाडीचे 50 उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन आणि चार अपक्ष अशा 56 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे. 


 

पार्श्वभूमी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) गेल्या काही महिन्यांपासून अगदी घराघरात चर्चेचा विषय झालेल्या कागल (Kagal) तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याच्या (Bidri Sakhar Karkhana) निवडणुकीचा निकाल आज (5 डिसेंबर) जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सत्ताधारी गटाचे चिन्ह विमान व विरोधी गटाचे चिन्ह कप बशी आहे. 


कोल्हापुरातील मुस्कान लॉन परिसरात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत असून या परिसराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या निवडणुकीत एकूण 56 हजार 91 पैकी 49 हजार 940 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता 173 मतदान केंद्रावर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. दोन्ही आघाडीचे 50 उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन आणि चार अपक्ष अशा 56 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. दरम्यान मतमोजणीतून निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत मतमोजणी पूर्ण होवून निकाल स्पष्ट होईल.


बिद्री कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने मतदान (Bidri Sakhar Karkhana Nikal) 


दरम्यान, बिद्री साखर कारखान्यासाठी (Bidri Sakhar Karkhana) सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना या निवडणुकीसाठी रंगला आहे. या निवडणुकीमुळे आगामी विधानसभेसाठी सुद्धा बरंच चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये कोण लै भारी ठरणार? आणि कोणाचा कंडका पडणार? याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे. या निवडणुकीसाठी कधी नव्हे ती चुरस यावेळी निर्माण झाली आहे. रविवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. एक एक मतासाठी नेते घरोघरी फिरताना दिसून आले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी निश्चितच नसेल हे सुद्धा स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीसाठी तब्बल सात साखर सम्राट प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.


बिद्रीच्या फडात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. त्याचबरोबर राजकीय चिखलपेक सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे निवडणूक वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी के. पी. पाटील यांना तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्यांचे मेहुणे फुटून विरोधी आघाडीत सामील झाल्याने चुरस आणखी वाढली आहे. 


विधानसभेची रंगीत तालीम (Bidri Sakhar Karkhana Nikal) 


दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन जिल्हाध्यक्ष, गोकुळ अध्यक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पूर्णतः विधानसभेची रंगीत तालीम एक प्रकारे पार पडली आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर अशा चार तालुक्यांमध्ये आहे. त्यामुळे विधानसभेची पेरणी करण्यासाठी सर्वच नेत्यांकडून मोठी ताकद पणाला लावण्यात आली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.