कोल्हापूर : वारसदार कोण हा आमचा घरगुती वाद आहे त्याबद्दल जास्त बोलणार नाही, दत्तक घेताना काय वाद झाला होता याबद्दल आपण सगळे जाणून आहात, अशी प्रतिक्रिया धुळ्याहून कोल्हापुरात आलेल्या राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी दिली. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज रिंगणात आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दत्तक विधानाशी संबंधित असलेल्या राजवर्धनसिंह कदमबांडे कोल्हापुरात आले होते. आज (28 एप्रिल) त्यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. 


तर कोल्हापुरात सक्रिय होईन


धुळ्यात जास्त कार्यरत राहिल्याने कोल्हापूरकडे थोडं दुर्लक्ष झालं. कुणी सांगितलं की भाजप राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या विरोधात आहे. मी कोणताही जुना वाद बाहेर काढण्यासाठी आलो नाही, तो आमचा घरगुती वाद आहे. मी आता केवळ महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी आलो असल्याचे म्हणाले. कोल्हापूरच्या जनतेची इच्छा असेल आणि भाजपने सांगितले तर कोल्हापुरात सक्रिय होईन, असेही त्यांनी सांगितले.


गादीचे वारसदार खरे की खोटे ही जनता ठरवेल 


ते म्हणाले की, मी राजर्षी शाहू महाराज यांचा रक्ताचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्स पद्माराजे यांचा चिरंजीव आहे. गादीचे वारसदार खरे की खोटे ही जनता ठरवेल असे त्यांनी सांगितले. मी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसदार आहे, आताचे शाहू महाराज हे संपत्तीचे वारसदार आहेत. आताचे शाहू महाराज हे शहाजी महाराज यांचे वारसदार असू शकतात, राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार नाहीत, असे त्यांनी सांगितले. 


वारसदार कोण हा आमचा घरगुती वाद 


कदमबांडे म्हणाले की, वारसदार कोण हा आमचा घरगुती वाद आहे त्याबद्दल जास्त बोलणार नाही. दत्तक घेताना काय वाद झाला होता याबद्दल आपण सगळे जाणून आहात. दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले. मी सध्या धुळे शहरात काम करतो, त्याच ठिकाणी राजकीय आणि सामाजिक काम करतो. कोल्हापूरच्या जनतेची इच्छा असेल आणि भाजपने सांगितले तर कोल्हापुरात सक्रिय होईन. 


इतर महत्वाच्या बातम्या