Kolhapur News: कोल्हापुरात पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून पतीने सराईत गुन्हेगाराने तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेत महेश राजेंद्र राख (वय 23, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याचा तलवार, फायटर, एडका, लोखंडी पाईपने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून आदित्य शशिकांत गवळीसह आठ जणांनी महेशचा खून केला. फुलेवाडी रिंग रोड येथील महेश राखच्या घरात घडली हल्लेखोरांनी बिअर बाटल्या आणि दगड घरावर फेकून परिसरात प्रचंड दहशत माजवली. खून करून फरार झालेल्यांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  

Continues below advertisement

बायकोला पळवून नेल्याने खून केला

सिद्धांत शशिकांत गवळी, आदित्य शशिकांत गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळोखे-मगर, मयूर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडलेसह एका अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आदित्य गवळीच्या बायकोला महेशने फूस लावून पळवून नेले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. मध्यरात्री आदित्य आणि सिद्धांत गवळी हे दोघे सख्खे भाऊ इतर सहा मित्रांसह महेशच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी घरावर दगड आणि बिअरच्या बाटल्या फेकत दहशत निर्माण केली. आठ जणांनी तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी पाईपने मारहाण करीत महेशचा निर्घृण खून केला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. हल्लेखोरांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. सर्व हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. कुटुंबीयांनी तातडीने महेशला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागाचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्यासह करवीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. 

कोल्हापुरात देखील टोळी युद्ध भडकण्याची शक्यता

या घटनेमुळं पुण्यापाठोपाठ कोल्हापुरात देखील टोळी युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महेशचा मित्र विश्वजीत भाले गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोर आणि विश्वजीत भाले यांच्यात किरकोळ कारणावरून रात्री वाद  झाला होता. या वादातून रात्री उशिरा हल्लेखोर विश्वजीत भालेच्या घरी दाखल झाले. ही घटना कळताच रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राख त्या ठिकाणी पोहोचला. त्यावेळी हल्लेखोरांनी महेश राख आणि त्याचा मित्र विश्वजीत भाले यांच्यावर एडका तलवार अशा धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात महेश घटनास्थळी मृत्युमुखी पडला तर विश्वजीत भाले हा गंभीर जखमी झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे. या घटनेच्या निमित्ताने कोल्हापुरात टोळी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या