Kolhapur Rain Update : जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत अल्प पाऊस झाल्याने चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. राजाराम बंधाऱ्यावरही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतीच्या कामानांही वेग आला आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ होऊ लागली आहे. नदीवरील रुई आणि इचलकरंजी येथील 2 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद भुदरगड तालुक्यात झाली तर त्यानंतर गगनबावडा तालुक्यात पावसाची नोंद झाली.
दरम्यान राधानगरी धरणांमधून 1 हजार 50 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्याने तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
- हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता
- मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज आहे.
- कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- मुंबईत आज संध्याकाळनंतर पावसाचा जोर बघायला मिळणार, पुढील पाच दिवस मुंबई आणि ठाण्यात यलो अलर्ट, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
- उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
इतर महत्त्वाच्या बातम्या