कोल्हापूर : राज्य सहकारी बँकांची पण मधल्या काळामध्ये फार मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु आज तीच राज्य सहकारी बँक साडेसहाशे कोटी रुपये नफ्यामध्ये आणि अतिशय सुस्थितीमध्ये अशा प्रकारची बँक आहे. कधी कधी आर्थिक संस्थांच्या बाबतीमध्ये राजकारण आणून बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फटका सभासदांना बसतो. खातेदारांना बसतो ठेवीदारांना बसतो कर्जदारांना बसतो, असे होता कामा नये, असे आवाहन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 


कोल्हापूर जिल्हा बँकेच्या विस्तारित नव्या इमारतीचे अजित पवारांच्या हस्ते झाले. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची एक गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीने या बँकांची स्थापना त्या काळामध्ये केली गेली. आज या बँका जिल्ह्याचा आर्थिक सामाजिक कृषी आणि शैक्षणिक औद्योगिक विकासाची एक मोलाची भूमिका बजावत आहेत. 


राजश्री शाहू छत्रपती शाहू महाराजांनी नेहमी सहकार्याला पण प्रोत्साहन देण्याचा काम केलं. सहकाराच्या माध्यमातून समाजाची प्रजाती साधण्यसाठी त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी सांगितलेलं सहकार्यावर संबंधीचे विचार आज देखील किती तंतोतंत लागू पडतात याची प्रचिती पावलोपावली आपल्याला सगळ्यांना येते. मला फार बारकाईने कुठली इमारत वास्तू बघण्याचा एक आवड आहे. मी बारकाईने ती इमारत बघत होतो, खूप चांगल्या पद्धतीने इमारत उभे करण्याचा प्रयत्न हा तुम्ही सगळ्यांनी केला त्याच्याबद्दल आर्किटेक्चर कॉन्ट्रॅक्टरचा आणि तुमचाही सगळ्या संचालक गोटाचं मी अभिनंदन करतो. 


ते पुढे म्हणाले की, दोन-चार दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मला कोणी सांगितलं नाही पण नोव्हेंबरच्या दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. तुमच्या सगळ्यांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अर्थमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळालेली आहे. केंद्र सरकार राज्य सरकार असेल, केंद्राचे पैसे आल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या लाभार्थ्याला तो लाभ देण्याचा प्रयत्न करत असतो. 


इतर महत्वाच्या बातम्या