Kolhapur Crime : सहायक शिक्षकाचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करून घेण्यासाठी 23 हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम बळवंत कांबळे (वय 46, पद वरिष्ठ लिपीक, नेमणूक अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) हत्तीमहल, सोमवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार शिक्षक 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. 


तक्रारदार शिक्षकांनी भविष्य निर्वाह निधीतील रक्कमेसाठी किणी हायस्कुलकडे अर्ज दिला होता. त्या अर्जावर प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय हत्तीमहल,कोल्हापूर या कार्यालयास पाठविण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा करताना उत्तम कांबळेची भेट झाली. क्लार्क उत्तम कांबळे याने भविष्य निर्वाह निधीचे प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करून साहेबांची सही घेण्यासाठी 25 हजार लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार शिक्षकांनी 22 ऑगस्ट रोजी लाचलूचपत विभागाकडे तक्रारी दाखल केली होती. 


लाच मागणीबाबत 23 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता तक्रारदाराकडे उत्तम कांबळेने 23 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 


सदरची कारवाई राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनात आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, नितीन कुंभार पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर,पोहेकॉ शरद पोरे, पोना सुनिल घोसाळकर, पोको रूपेश माने, अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या