HSC Result : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला बारावी परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Result News) जाहीर झाला. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल 97.21 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा 95.7 टक्के लागला आहे. राज्यात यावर्षीही मुलींनी निकाल बाजी मारली आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येईल.


यावेळी आपण एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावी निकाल देखील हा निकाल पाहू शकणार आहात. आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येईल. शिवाय 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. 


दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. 


निकाल कसा पहाल ? 


दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 


कसा चेक कराल आपला निकाल ?



  • स्टेप 1 - https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा

  • स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा

  • स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका

  • स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा

  • स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 

  • स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

  • दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांची संख्या


विभागनिहाय निकाल 



  • कोकण - 97.22 टक्के 

  • पुणे - 93.61 टक्के 

  • कोल्हापूर - 95.07 टक्के 

  • अमरावती - 96.34 टक्के 

  • नागपूर - 96.52 टक्के

  • लातूर -  95. 25 टक्के

  • मुंबई - 90.91 टक्के

  • नाशिक - 95.03 टक्के

  • औरंगाबाद - 94.97 टक्के