Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या घरफाळा 4 टक्के सवलत योजनेंतर्गत 1 कोटी 2 लाख 34 हजार 906 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून शहरातील मिळकत कर चालू मागणी एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना दि. 1 जुलै  ते 30 सप्टेंबर अखेर घरफाळ्यामध्ये 4 टक्के सवलत योजना सुरु आहे. 


1 एप्रिल ते 6 सप्टेंबर 2022 अखेर रु.37 कोटी 19 लाख 72 हजार 312 इतका मालमत्ता कर मिळकतधारकांनी भरणा केला आहे. 1 एप्रिल ते 30 जून 2022 रोजी अखेर 6 टक्के सवलत योजना होती. आज अखेर 68,682 करदात्यांनी एकूण रु.37 कोटी 19 लाख 72 हजार 312 इतका कर भरणा केला आहे.


महानगरपालिकेच्यावतीने शहरातील सर्व मिळकतधारकांना पोस्ट ऑफीस मार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठीची देयके लागू करण्यात आली आहेत. तथापि, ज्या मिळकतधारकांस त्याचे देयक मिळाले नसेल, तर विभागीय घरफाळा कार्यालय या ठिकाणी पुढील 15 दिवस देयके ठेवण्यात आली आहेत. त्या ठिकाणाहून मिळकतधारकांनी आपली बिले  उपलब्ध करुन घेवू शकतात.


शहरातील सर्व मिळकतधारकांनी आपल्या कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे व करदात्यांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या